खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची जबाबदारी कंत्राटदारावरच, राज्य सरकारच्या सुचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – राज्यात रस्ते खड्ड्यांमुळे अपघात होण्याचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे रस्त्यांवर जर खड्ड्यांमुळे अपघात झाला तर रस्त्याच्या कंत्राटदाराची किंवा टोलवसूली करणाऱ्या कंपनीची जबाबदारी निश्चित करण्यात यावी अशी सुचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. परिवहन परिषदेच्या बैठकित ते बोलत होते.

बेकायदा वाहतुक करणाऱ्यांचे परवाने रद्द करा
राज्यात प्रवासी वाहनांमधून, वाहनांच्या टपावरून, डिक्कीतून बेकायदेशीर मालवाहतुक करणाऱ्या वाहनचालकांचे परवाने रद्द करा. याची क़डक अंमलबजावणी करण्यात यावी असेही त्यांनी आदेश दिले आहेत.

मोटार सायकली जप्त करण्याबाबत विचार
मुंबईत रात्रीच्या वेळी बेदरकारपणे मोटरसायकल चालविणे, सायलेन्सर मॉडीफाय करून मोठ्या आवाजात दुचाकी चालविणे असे प्रकार सर्रासपणे केले जातात.या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक कारवाई करणे गरजेचे आहे. दरम्यान यासाठी दंड वाढीसह मोटर सायकल जप्तीची कारवाई करता येईल का असा विचार करावा असे निर्देश त्यांनी दिले आहेत.

चालकांच्या वयोमर्यादेबाबतही विचार
चालकांचे वय वाढल्यानंतर विशिष्ट वयोमर्यादेनंतर त्यांच्या दृष्टि क्षीण होण्याचे प्रकार समोर येतात. त्यांच्या प्रकृतीविषयक समस्याही वाढतात. त्यामुळे त्याचा परिणाम वाहन चालविण्यावर होतो. वाहन चालविण्यासाठी विशिष्ट वयोमर्यादा निश्चित करण्यात यावी का यावर बैठकीत विचार झाला. तसेच यावर अभ्यास करण्याचा निर्णय झाला.

राज्यातील अपघातांची संख्या

· 2013 – 61,890

· 2014 – 61,627

· 2015 – 63,805

· 2016 – 39,848

· 2017 – 35,853

· 2018 – 35,926

राज्यात अपघातांतील मृतांची संख्या

· 2013 – 12,194

· 2014 – 12,803

· 2015 – 13,212

· 2016 – 12,883