फडणवीस सरकार शेतकऱ्यांना देणार गिफ्ट ; एवढ्या हजार कोटींची तरतूद 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्रीय अर्थसंकल्पात मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या योजनांची तरतूद केल्यानंतर फडणवीस सरकार हि शेतकऱ्यांसाठी गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. या संदर्भात आगामी अर्थसंकल्पात राज्य सरकार घोषणा करण्याची शक्यता आहे.‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजने’साठी अपात्र ठरलेल्या शेतकऱ्यासाठी हि योजना आखण्यात येणार आहे असे वृत्त समोर आले आहे.

तीन राज्यात विधानसभेच्या निडवणुकीत भाजपला पराभवाचे तोंड पहावे लागले होते. भाजपाच्या सरकार चालवण्याच्या नीतीवर शेतकरी नाराज असल्याने त्याचा तोटा भाजपला तीन राज्यात भोगावा लागला  होता. याची पुनरावृत्ती महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत होऊ नये म्हणून भाजप आत्ता पासून शेतकऱ्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. २ हेक्टर कृषिक्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मोदींनी  ‘प्रधानमंत्री किसान सन्मान योजना’ सुरु केली आहे. त्या योजनेस अपात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासन हि नवी योजना आणणार आहे.राज्यातील ७ लाख शेतकरी केंद्राच्या योजनेपासून वंचित राहणार आहेत म्हणून या शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र्र शासन येत्या अर्थसंकल्पात योजना आणू इच्छित आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार शेतकऱ्यांसाठी सुरु करण्यात येणाऱ्या योजनेसाठी राज्य शासन आगामी अर्थसंकल्पात ४ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद करणार आहे. या पैशातून शेतकऱ्यांना अनुदान देण्याबरोबरच विविध सवलती देण्याची योजना आखण्यात  येईल असे या वृत्तात म्हणले आहे.