व्यापाऱ्यांसाठी खुशखबर ! राज्य सरकार आखणार निर्यातीचे नवे धोरण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – केंद्र सरकारच्या ताब्यात असणाऱ्या निर्यात विषयात लक्ष घालत राज्य सरकारने नवीन निर्यात धोरण तयार केले आहे. राज्यात अनेक वस्तूंची आणि उत्कृष्ट शेतमालाची निर्मिती होत असताना त्या मालाला योग्य पद्धतीने परदेशी बाजरपेठ उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकार हे महत्वाकांशी धोरण आणते आहे.

जागतिक स्तरावर निर्यातीच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण असून भारताच्या मालाला जागतिक बाजार पेठेत चांगलीच मागणी आहे. केंद्र सरकार निर्यातीचे धोरण आखते म्हणून राज्यातील माला निर्यात करण्यासाठी अडचण येते असे राज्य सरकारला वाटते म्हणून राज्य सरकार नवे निर्यात धोरण राबवण्याच्या तयारीत आहे असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

येत्या काळात राज्य सरकाचे नवे धोरण तयार झाल्यास निर्यातीची नव्याने संधी सर्वांना उपलब्ध केले जाणार आहे. शेतमालाच्या सर्व वस्तू आणि औद्योगिक क्षेत्रात उत्पादित होणाऱ्या वस्तू देखील या माध्यमातून विकल्या जाण्यास मदत होणार आहे असे सूत्रांनी दिलेल्या महिती वरून स्पष्ट झाले आहे. असे धोरण बनवणारे महाराष्ट्र्र हे देशातील पहिले राज्य असणार आहे असा दावा उद्योग मंत्रालयाने केला आहे.

महाराष्ट्रातून सध्यस्थितीला ३५ टक्के निर्यात होते आहे. रासायनिक, औषधे, स्टील,सिमेंट आदी उत्पादनाची निर्यात केली जाते आहे. मुंबई बंदर आणि विमान तळाच्या माध्यमातून सध्या निर्यात केली जाते. मुंबईच्या बंदराच्या सहाय्याने सध्या निर्यातीला अत्यंत वाव असल्याचे निदान राज्य सरकारने केल्याने आता याबाबत निश्चित धोरण आखण्यात येणार आहे.