राज्यसरकारने साखर उद्योगासाठी 3 हजार कोटींचे साॅफ्ट लोन जाहीर करावे : हर्षवर्धन पाटील

इंदापूर : प्रतिनिधी (सुधाकर बोराटे) –    महाराष्ट्रातल्या साखर उद्योगासाठी तीन हजार कोटीं रूपयांचे साॅफ्ट लोन राज्य सरकारने त्वरीत महीनाभराच्या आत द्यावे, या प्रमुख मागणीसह आणखी इतरही मागण्याबाबतचे निवेदन विरोधी पक्षाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचेकडे देण्यात आले असल्याची माहीती राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथील भाग्यश्री बंगला येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलताना दीली.

हर्षवर्धन पाटील बोलताना म्हणाले की महाराष्ट्रात 110 साखर कारखाने हे सहकारात असुन 95 साखर कारखाने खासगीत सुरू आहेत. या कारखाण्यान्यापैकी जवळ जवळ 60 ते 70 कारखान्याचा नेटवर्क निगेटीव्ह आहे. त्यांचा एन.डी.आर.हा मायनस आहे. त्यामुळे नाबार्डच्या मते राज्य सरकारच्या हमीशिवाय जिल्हा बँका व राज्य सहकारी बँक कर्ज देउ शकनार नाही,म्हणून राज्यसरकारने या कारखाण्याकरीता दोन हजार कोटींची सरकार गॅरंटी (थकहमी) द्यावी, महाराष्ट्रातल्या साखर उद्योगासाठी तीन हजार कोटीं रूपयांचे साॅफ्ट लोन राज्य सरकारने द्यावे.

सरकारमार्फत कारखाण्यांची होणारी वसुलीला स्थगीती देवुन सदर स्थगीती दोन वर्षानंतर करण्यात यावी या तीन प्रमुख मागण्यासह इतरही मागण्या विरोधी पक्षाच्या वतीने राज्य सरकारकडे करण्यात आल्या असुन सदर मागण्यातील मुद्यांची पुर्तता एक महीण्याच्या आत व्हावी अन्यथा कारखाने सुरू करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होणार असल्याचे हर्षवर्धन पाटील म्हणाले. सध्या लाॅक डाउन सुरू असुन कारखानदारांच्या साखरेल मार्केटमध्ये सध्या खरेदीदार नाही.त्यामुळे कोट्यावधी रूपये कीमतीची साखर कारखाण्यांच्या गोडाउनमध्ये पडून आहे.सदर साखर मार्केटमध्ये विक्री झाल्यास कारखाने कोणत्याही मदतीविना सुरू होतील परंतु सध्या कोरोनामुळे शक्य नसल्याने राज्य सरकारने कारखानदारांच्या मागण्याबाबत सकारात्मक निर्णय घेवुन सहकार्य करावे असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.