‘कोरोना’शी लढण्यासाठी ‘ही’ 2 औषध खरेदी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचे संक्रमण वाढू नये यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता. आता या लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागात कोरोनाचे संक्रमण होण्याचे प्रमाण वाढले आहे. हे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागाकडे लक्ष केंद्रीत करून बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करून टेस्टींगचे प्रमाण वाढवावे म्हणजे बाधितांची संख्या कमी होईल असा विश्वास राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी (दि.29) व्यक्त केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते.
अनिल देशमुख म्हणाले की, राज्यातील 20 ते 22 लाख परप्रांतीय हे आपापल्या राज्यात गेले आहेत. लॉकडाऊन शिथिल झाल्याने उद्योग सुरू झाले आहेत.

त्यामुळे परप्रांतीय परत राज्यात येत आहेत. कोरोनाचे संक्रमण वाढू नये यासाठी येणाऱ्यांबाबत दक्षता घ्यावी. फलटण आणि जावली तालुक्यात संसर्ग झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. तो दर कमी करण्यासाठी प्रयत्न करावा अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. अनिल देशमुख पुढे म्हणाले, जिल्हा प्रशासन समन्वयाने चांगले काम करीत आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यावर भर द्याव. प्रतिबंधित क्षेत्रात शासनाने दिलेल्या सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करावी.

त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांची व गरोदर मातांची काळजी घ्यावी. तसेच गंभीर असलेल्या कोरोना बाधित रुग्णांसाठी टॉसिलीझुमॅब व रेमडेसिवीर हे औषध शासन खरेदी करणार असल्याचे देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 55 वर्षावरील 12 हजार कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनीवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील, शिवंद्रसिंहराजे भोसले, दिपक चव्हाण, महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते आदी उपस्थित होते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like