राज्य सरकार मार्फत धोरणात्मक निर्णय घेऊन कोथरूडच्या समस्या सोडवणार : चंद्रकांत पाटलांची हमी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड करांचे जीवन आनंदी सुलभ आणि सुरक्षित करण्यासाठी पुणे महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेतच. त्याला राज्य सरकारच्या धोरणा मार्फत ठोस निर्णय आणि अंमलबजावणीची जोड देण्यात येईल, अशी हमी कोथरूड विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज येथे दिली. चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारार्थ कोथरूड परिसरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
chandrakant patil

याप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून राज्यामध्ये धडाडीने विकास पर्व राबवणारे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पुन्हा एकदा निवडून द्यायचे आहे. स्थानिक प्रशासनाकडून नागरिकांसाठी विविध योजना कार्यान्वित केल्या जातातच. मात्र त्याला राज्य शासनाच्या ठोस नियोजन निर्णय व अंमलबजावणी ची जोड मिळणे अतिशय गरजेचे असते. कोथरूड चे आमदार पुण्याचे पालक मंत्री आणि राज्य सरकारमधील मंत्री या नात्याने चोख नियोजन ठोस निर्णय आणि कालबद्ध अंमलबजावणी या त्रिसूत्रीचा जोरावर आपण दीर्घकालीन नागरी सुविधांचे धोरणात्मक कार्यवाही करणार आहोत.

चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर आपला पूर्ण विश्वास असून राज्य सरकारमधील विकास पर्व अखंडित सुरू ठेवण्यासाठी पुण्यातील सर्व जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करा असे आवाहनही चंद्रकांत दादा पाटील यांनी यावेळी केले.

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

स्थानिकांकडून जंगी स्वागत, तर महिलांकडून औक्षण
कोथरूड विधानसभेचे उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांच्या प्रचारा निमित्त आयोजित रॅलीला कोथरूडकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्थानिकांनी ठिकठिकाणी दादांचे जंगी स्वागत केले, तर महिलांनी औक्षण करुन चंद्रकांत दादांना शुभेच्छा दिल्या.

सकाळी १० च्या सुमारास कर्वेरोडमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून रॅलीला सुरुवात झाली. आंबेडकर चौकातून इंगळे नगर, वरघडे चौक, भारत कॉलनी ,शाहू कॉलनी, ११ नं पानद रोड, कुलाश्री कॉलनी(नागरिकांशी संवाद), संदीप खुंटाळे(श्रीमान चौक), शहीद चौक, ४ नं गल्ली, बिजली चौक विकास चौक या मार्गावरुन ही रॅली निघाली.

यावेळी ठिकठिकाणी स्थानिकांनी चंद्रकांतदादांचे जंगी स्वागत केले. तर महिलांनी औक्षण करुन शुभेच्छा दिल्य.

नागरिकांशी संवाद
कर्वेनगर मेन चौक, वडार वस्ती, श्रमिक वस्ती, होम कॉलनी विकास चौकात रॅली झाल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील यांनी मतदारांना संबोधित केले, तसेच आगामी निवडणुकीत महायुतीच्या प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.

visit : policenama.com