एल्गार परिषद प्रकरणातील गौतम नवलखा यांच्या सुटकेविरोधात राज्य सरकारची सुप्रीम कोर्टात धाव 

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन 

एल्गार परिषद प्रकरणाशी संबंध असल्या कारणाने अटकेत असलेल्या गौतम नवलखा यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दोन दिवसांपूर्वी दिले आहेत. ३१ डिसेंबर रोजी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेचा कोरेगाव भीमा प्रकरणाशी संबंध जोडत महाराष्ट्र पोलिसांनी काही सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले होते. २८ आॅगस्ट रोजी या सर्वांना अटक करून नदरकैदेत ठेवण्यात आले. त्यापैकी गौतम नवलखा यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिले आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5133dded-c6f9-11e8-9774-1188a01f9823′]

गौतम नवलखा यांच्या सुटकेविरोधात महाराष्ट्र सरकारने सु्प्रीम कोर्टात धाव घेतली आहे. नवलखा यांची अटक चुकीच्या पद्धतीने झाली असल्याचा शेर देत दोन दिवसांपूर्वी दिल्ली हायकोर्टाने त्यांची सुटका केली होती. गौतम नवलखांच्या अटकेनंतर दिल्ली सत्र न्यायालयाने त्यांना ज्या पद्धतीने ट्रान्झिट रिमांड मंजूर केली होती त्यावरही हायकोर्टानं प्रश्न उपस्थित केला आहे. केस डायरी मराठीत असताना, ती समजून घेण्याआधीच सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी इतक्या लवकर पुणे पोलिसांवर विश्वास कसा दाखवला असा सवालही हायकोर्टात उपस्थित करण्यात आला होता.

लातूर:  मांजरा धरणाने मृत पातळी गाठल्याने दहा दिवसातून एकदा पाणीपुरवठा

नदरकैदेत ज्यांना ठेवण्यात आले होते, त्यात मजदूर संघाच्या नेत्या सुधा भारध्वाज तेलुगू कवी वरवर राव, मानवाधिकार कार्यकर्ते अरुण फरेरा, वरेनन गोंजालविस, गौतम नवलखा यांचा समावेश होता. त्यातील गौतम नवलखा यांच्या यांच्या सुटकेचे आदेश दिल्ली हायकोर्टाने दिलेत. एल्गार परिषदेप्रकरणी गौतम नवलखा यांना दिल्लीतून अटक करण्यात आली होती.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’ac7b37c6-c6fa-11e8-aa43-d5f58a141512′]
You might also like