महाराष्ट्र : अमरावती-यवतमाळमध्ये कोरोना विषाणूच्या परदेशी स्ट्रेनची कोणतीही लक्षणे नाहीत

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   महाराष्ट्रात कोरोना संसर्गाशी संबंधित प्रकरणे कमी होण्याचे नाव घेत नाही. अद्यापही राज्यात संक्रमणाची 5000 हून अधिक प्रकरणे येत आहेत. दरम्यान, महाराष्ट्र आरोग्य विभागाने एक निवेदन जारी केले आहे की, अमरावती आणि यवतमाळमध्ये कोविड – 19 विषाणूचे कोणतेही नवीन स्ट्रेन आतापर्यंत सापडलेले नाही. आरोग्य विभागाने म्हंटले की, राज्यातील अमरावती, यवतमाळ, सातारा आणि पुणे अशा काही जिल्ह्यांमध्ये अचानक नवीन प्रकरणे का वाढत आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पुणे येथील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये अमरावती, यवतमाळ आणि सातारा येथील चार नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. चाचणी अहवालानुसार, या जिल्ह्यांत साथीच्या आजाराशी संबंधित ब्रिटन , दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझीलमध्ये आढळलेले कोणतेही नवीन परदेशी स्ट्रेन आढळले नाहीत. या पुणे वैद्यकीय महाविद्यालयात 12 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली असून त्यात अनुवांशिक क्रमात कोणताही बदल आढळला नाही.

पुढील आठवड्यापर्यंत मिळणार सविस्तर अहवाल

आरोग्य विभागाने म्हंटले कि, पुढील तपास सुरु आहे. अकोला, अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील आणखी काही नमुने अनुवांशिक चाचणीसाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ सेल सायन्स, पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. यासंदर्भात सविस्तर अहवाल पुढील आठवड्यापर्यंत अपेक्षित आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. गुरुवारी, कोरोनाचे 5,427 नवीन रुग्ण आढळले. जो या वर्षाचा सर्वात मोठा आकडा आहे. या काळात महाराष्ट्रात कोरोनामुळे 38 लोकांचा मृत्यू झाला. राज्यात सक्रिय रूग्णांची संख्या 40 हजारांच्या वर आहे. तर कोरोनामधील नवीन प्रकरण पाहता यवतमाळ आणि अमरावतीमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. यवतमाळात 28 फेब्रुवारीपर्यंत लॉकडाऊन राहील. यवतमाळमध्ये 8 फेब्रुवारीपासून कोरोनाच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे.