इंदापूर येथे राज्यस्तरिय डांन्स स्पर्धेचे आयोजन

सुधाकर बोराटे 

इंदापूर :  पोलीसनामा ऑनलाईन – पुणे जिल्ह्यातील इंदापुर येथे राज्यस्तरीय खुला गट डांन्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष सुधाकर बोराटे यांनी दीली.

जोतिराव फुले चॅरीटेबल ट्रस्ट इंदापूर यांचे वतीने गरीब विद्यार्थी निधीकरिता इंदापूर येथिल गुरूकृपा सांस्कृतिक भवन, एस टी स्टॅड पाठीमागे, राहुल सिनेमा शेजारी या ठिकिणी डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. ही संपूर्ण स्पर्धा खुल्या गटात होणार आसुन सोलो डान्स, ग्रुप डान्स यातील पाच वर्षावरील सर्व स्पर्धकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या स्पर्धा शनिवार दिनांक १ डिसेंबर २०१८ रोजी दुपारी दुपारी सुरु होणार आसुन या स्पर्धेचे उदघाटन राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते दुपारी दोन वाजता होणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्पर्धकांनी स्पर्धा सुरू होण्यापूर्वी दोन तास अगोदर कार्यक्रम स्थळी उपस्थित रहावे. स्पर्धकांने आपल्या आवडीचे गाणे निवडलेले आहे ते गाणे पेन ड्राईव्ह मध्ये पहिल्या नंबरला भरून आणावे.

बॉलीवूडचे आतापर्यंतचे सर्वात महागडे गाणे प्रदर्शित

स्पर्धेसाठी नाव नोंदणी फी ५०० रूपये आहे. तर स्पर्धेतील प्रथम क्रमांकासाठी रक्कम रूपये २१ हजार व ट्राॅफी बक्षीस पूणे जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती प्रवीण माने यांचे वतीने ठेवण्यात आले आहे. तर द्वितीय १५ हजार, तृतिय बक्षीस ११ हजार, चौथे बक्षिस ७ हजार रूपये व ट्राॅफी देण्यात येणार आहे. या स्पर्धेचे बक्षीस वितरण त्याच दिवशी सायकांळी इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांचे अध्यक्षतेखाली व इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पूणे जिल्हा परिषद बांधकाम सभापती प्रविण माने, इंदापुर नगरपरिषद नगराध्यक्षा अंकिता शहा यांचे हस्ते होणार आहे.

ग्रामिण भगातील तरूण व होतकरू कलाकारांच्या कलेला हक्काचे व्यासपिठ निर्माण करून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असुन स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असल्याची माहीती आयोजक सुधाकर बोराटे यांनी दीली. या बाबत अधीक माहितीसाठी. दत्तात्रय सावंत ९९७०५०९११५,  प्रशांत उंबरे ७७०९५००७०७,अमोल मिसाळ ९८९०१७९९९५, सुधाकर बोराटे ९५६११९०३३२ यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.