लासलगाव येथे भव्य राज्यस्तरीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा

लासलगांव : पोलीसनामा ऑनलाइन – लासलगाव प्रीमियर लीग आयोजित भव्य राज्यस्तरीय
T-20 क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. येथील स्व.सीताबाई पानगव्हाणे मैदानावर 12 जानेवारी पासुन सदर स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या स्पर्धे साठी प्रवेश फी अकरा हजार रुपये असणार आहे.या साठी प्रथम पारितोषिक एक लाख रुपये (स्व.सुरेश गुंजाळ स्मरणार्थ). द्वितीय पारितोषिक 71000/_रुपये (यशश्री ग्रामीण पतसंस्था व राणा स्टील लासलगांव). तृतिय पारितोषिक 31000/_(लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे स्मरणार्थ)तर चतुर्थ पारितोषिक ग्रामीण विजेता संघास देण्यात येईल.

प्रत्येक मॅच मध्ये “मॅन ऑफ द मॅच “साठि गुंजाळ टायर्स तर्फे तर “मॅन ऑफ द सिरींज “साठि स्व.डाॅ. हरिष पलोड यांच्या स्मरणार्थ ट्रॉफी देण्यात येईल. प्रथम येणाऱ्या 32 संघांना प्राधान्य देण्यात येईल.

शंभर कि.मी.बाहेरील संघाची राहण्याची व्यवस्था करण्यात येईल. सदर स्पर्धा बाद पध्दतीने खेळविण्यात येतील, पंचाचा निर्णय अंतिम राहील. उशीरा येणार्या संघाला दंड आकारला जाईल, सामन्या दरम्यान खेळाडुला इजा झाल्यावर व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी.

स्पर्धे साठी संपर्क नितीन होळकर (9623555783) तर नितीन घोडके (9579077198) या भ्रमणध्वनी संपर्क साधावा.

बँक ऑफ इंडिया शाखा लासलगांव
IFSC code(BKID0000816)असुन खाते क्रमांक (081610110003163) या वर प्रवेश फी जमा करावी असे आयोजकांच्या वतीने आव्हान केले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/