आर्थिक परिस्थितीला वैतागून वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन

एकीकडे भारताचे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत चमकताना दिसत आहेत, असे असताना एका क्रीडापटूने आत्महत्या केल्याची बातमी मनाला चटका लावणारी आहे. माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे राहणाऱ्या राष्ट्रीय स्तरावर रौप्यपदक तर सलग दोन वेळा राज्यस्तरीय गोल्ड मेडल पटकावणाऱ्या वेटलिफ़्टरने आत्महत्या केल्याचे दुर्दैवी वृत्त समोर आले आहे. वैभवी पाटेकर असे या तरुणीचे नाव आहे.

याबाबत मिळालेलीच अधिक माहिती अशी की, वैभवी मुंबईतील गोरेगाव कॉलेजची विद्यार्थिनी होती. तिची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिची आई ज्योतिका पाटेकर दाबेलीची गाडी चालवायची. वैभवी देखील तिच्या आईसोबत दाबेलीच्या गाड्यावर काम करायची. सोमवारी मध्यरात्रीपासून वैभवी बेपत्ता होती. तेव्हापासून पोलिसांसह तिच्या नातेवाईकांकडून तिचा शोध घेतला जात होता. अखेर गोरेगाव येथील तलावात तिचा मृतदेह आढळला आहे.

तिच्या या अकाली एक्सिटमुळे संपूर्ण क्रीडा विश्वात शोककळा पसरली आहे.