जिजामाता प्राथमिक शाळेत राज्यस्तरीय ‘युनिस्को क्लब’ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा

लासलगाव – कॉन्फडरेशन ऑफ यूनेस्को क्लब एंड एसोसिएशन ऑफ इंडिया व यूनेस्को स्कूल क्लब्स ऑफ महाराष्ट्र द्वारा आयोजित भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन कोविड 19 जनजागृती चित्रकला (पोस्टर / ड्रॉइंग)स्पर्धा नुकतीच राज्यभरामध्ये संपन्न झाली.कोरोनाच्या उद्रेकामुळे शाळा बंद आहे विद्यार्थ्यांचे शिक्षण मात्र सुरू असून सोबतच विद्यार्थी विविध छंद ही जोपासत आहेत.त्यांच्या मधील कलागुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण व्हावी यासाठी राज्यात प्रथमच युनेस्को मार्फत या राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित केली.

यास्पर्धेत लासलगाव शिक्षण सहायक मंडळ संचलित आय.एस.ओ मानांकित जिजामाता प्राथमिक शाळेतील 200 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.इयत्तावार वॉटसअप ग्रुपच्या माध्यामातुन पालक व विद्यार्थ्यांना स्पर्धेची माहिती देण्यात आली होती.सर्वच विद्यार्थ्यांनी स्वत:ची कल्पक बुद्धी वापरून कोरोना जनजागृती करणारे संदेश चित्राद्वारे दिलेत.सर्वच स्पर्धकांनी अतिशय सुबक व सुंदर चित्र काढली होती.सहभागी स्पर्धकास युनेस्को जनरल सेक्रेटरी न्यू दिल्ली यांच्या स्वाक्षरीचे डिजिटल सहभाग प्रमाणपत्र मिळनार आहे.तसेच शाळेला देखील प्रशंसा प्रमाणपत्र प्राप्त होनार आहे.संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील व मुख्याध्यापक अनिस काझी यांच्या मार्गदशनाने दिनांक 22 मार्च पासुन ऑनलाईन शिक्षण प्रकल्प संस्थेने सुरू केलेला आहे.आता पर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करन्यात आले आहे.

शाळेत हा उपक्रम राबविल्या बद्दल संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब पाटील, सचिव संजय पाटील, उपाध्यक्ष निवृत्ती गायकर, पंचायत समिती सदस्या रंजनाताई पाटील, संचालिका निताताई पाटील,संचालक शंतनू पाटील, संस्थेच्या कार्यकारी अधिकारी वैष्णवी पाटील यांनी सर्व शिक्षक व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन केले.उपक्रम यशस्वी करण्याकरिता उपशिक्षक कैलास भामरे,सुहास बच्छाव,दिलिप शिरसाठ,युनेस्को क्लब समन्वयक समिर देवडे,राजाराम जाधव,योगीराज महाले, केदुबाई गवळी,हर्षदा बच्छाव यांनी परिश्रम घेतले.