‘या’ 2 प्रमुख कारणांमुळे दिल्ली निवडणुकीत आमचा पराभव : भाजपा नेते मनोज तिवारी

नवी दिल्ली : वृत्त संस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने सध्या भाजपामध्ये मंथन सुरू आहे. याबाबतीत विविध तर्क-वितर्क वर्तवले जात आहेत. आता दिल्ली भाजपा प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सुद्धा एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ते हिंदू-मुस्लिम बाबत बोलत नव्हते. परंतु, आंदोलनांना अजूनही योग्य मानत नाही. गोली मारो वाली, घोषणा भाजपाचे विचार नाहीत. गद्दारांना शिक्षा देण्यासाठी देशातील कायदा समर्थ आहे.

सीएम चेहर्‍यासह निवडणूक लढलो असतो परिणाम वेगळे

त्यांनी मान्य केले की, जर मुख्यमंत्र्यांच्या चेहर्‍यासोबत निवडणुकीत उतरलो असतो तर परिणाम वेगळे दिसले असते. परंतु, हा पार्टीचा सामुहिक निर्णय होता. सोबतच जाहीरनामा येण्यास खुप उशीर झाला, ज्यामुळे तो लोकांपर्यंत योग्यवेळी पोहचला नाही. त्यामध्ये दोन रूपये किलोने पीठ देण्याचाही मुद्दा होता.

48 जागा जिंकण्याचा अंदाज चुकीचा नव्हता

तिवारी म्हणाले, 48 जागा जिंकण्याचा माझा अंदाज होता, जो चुकीचा नव्हता. सुमारे 40 टक्के मते शेयर आहेत. आठ टक्के मते वाढणे साधी गोष्ट नाही. परंतु, आम्ही ही मते जागांमध्ये बदलू शकलो नाही. पराजयाची समिक्षा सुरू झाली आहे. लोकांशी बोलू आणि ज्या विषयांकडे लक्ष दिले नाही, त्यावर आजपासून काम करण्यास सुरूवात करू.

पार्टीचे नेते माझ्यावर नाराज नाहीत

भाजपा प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर तिवारी यांच्या पार्टीचे नेते त्यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चेबाबत तिवारी म्हणाले, मी आज नव्हे, तर 2016 मध्ये अध्यक्ष झालो आहे. 2019च्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. पार्टीने माझ्याकडून राजीनामा मागितलेला नाही.