राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची ‘सोडत’ जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा वाढतच असला तरी राज्यातील 27 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज (बुधवार) झाली. पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील 27 महापालिकांमधील महापौर पादाच्या आरक्षणाची सोडत आज मुंबईत मंत्रालयात काढण्यात आली. पुण्यासह राज्यातील 10 महापालिकांच्या महापौर आणि उपमहापौरांचा अडीच वर्षाचा कार्य़काळ 14 सप्टेंबर 2019 रोजी संपुष्टात आला.

दरम्यान, त्याच वेळी विधानसभा निवडणुका असल्याने शासनाने या पदांना 3 महिन्याची मुदत वाढ दिली होती. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर आणि नाशिकसाठी महापौरपद खुल्यावर्गासाठी राखीव झाल्याने या शहरातील महापौरपदाकडे अनेक इच्छुकांच्या नजरा वळल्या आहेत.

कोल्हापूरसह नांदेड, सोलापूर, मालेगाव, या महानगरपालिकेत महिलांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झाले असून नवी मुंबई जळगाव, भिवंडी, अकोला, पनवेल, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद आणि चंद्रपूर येथील महापौर या खुल्या प्रवर्गातील महिला असतील. तर मुंबईसह पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, कल्याण डोंबिवली, सांगली आणि उल्हासनगर या महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी महापौरपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.

पुणे महापालिकेत संपूर्ण सत्ता भाजपची असल्याने पुढील महापौर भाजपचाच होईल. पुण्यात राष्ट्रवादीची सत्ता असताना, त्यांनी संपूर्ण पाच वर्षाच्या कालावधीत प्रत्येकी सव्वा वर्षाचा कालावधी महापौर पदासाठी दिला होता. त्यामुळे चार जणांना महापौरपद भूषवण्याची संधी मिळाली. भाजपने मात्र तो फॉर्म्युला वापरला नाही.

महापौर सोडत –

• मुंबई- ओपन
• पुणे – ओपन
• नागपूर – ओपन
• ठाणे- ओपन
• नाशिक – ओपन
• नवी मुंबई – ओपन महिला
• पिंपरी चिंचवड – ओपन महिला
• औरंगाबाद- ओपन महिला
• कल्याण डोंबिवली – ओपन
• वसई विरार- अनुसूचित जमाती
• मिरा भाईंदर-अनुसुचित जाती
• चंद्रपूर – ओपन महिला
• अमरावती- बीसीसी
• पनवेल- ओपन महिला
• नांदेड-बीसीसी महिला
• अकोला – ओपन महिला
• भिवंडी- खुला महिला
• उल्हासनगर- ओपन
• अहमदनगर- अनुसूचित जाती (महिला)
• परभणी- अनुसूचित जाती (महिला)
• लातूर – बीसीसी सर्वसाधारण
• सांगली- ओपन
• सोलापूर-बीसीसी महिला
• कोल्हापूर-बीसीसी महिला
• धुळे – बीसीसी सर्वसाधारण
• मालेगाव – बीसीसी महिला
• जळगाव खुला महिला

Visit : Policenama.com 

You might also like