राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, यादी वरिष्ठांच्या दरबारी

मुंबई : वृत्तसंस्था

आगामी निवडणूका डोळ्यासमोर ठेवून फडणवीस सरकारने मंत्री मंडळ विस्ताराचा निर्णय घेतला असून यामध्ये कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कोणाला डच्चू द्यायचा, कोणाला मंत्रीमंडळात घ्यायचे याची यादी भाजपने केली असून ती दिल्लीत वरिष्ठांकडे पाठवली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8bf1e1c8-cd76-11e8-af34-c77f85ea2194′]

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जातेय. निवडणुकीला पूरक ठरतील असे बदल मंत्रिमंडळात केले जातील. भाजपच्या दोन ते तीन कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळणार असल्याची माहिती मिळतेय.

राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांचा मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामा घेण्याची शक्यता आहे. मात्र, उद्धव ठाकरेंची परवानगी असल्यास पुन्हा शपथ देऊन मंत्री पद दिले जाईल.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’916b8e54-cd76-11e8-afab-23730e8606b6′]

शिवसेनेचा कोटा संपला असला, तरी अधिकची दोन मंत्री पद देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, दसरा मेळाव्यानंतर विस्तार करण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी आहे. त्यामुळे आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला डच्चू मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वांनाच लागली आहे.

खडसेंची कामगिरी समाधानकारक
[amazon_link asins=’B0796QP4LS’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’97ca914a-cd76-11e8-bda3-7b7c93be0c4c’]

मुंबई : आमदार म्हणून माझी कामगिरी समाधानकारक असल्याचे सर्व्हेतून समोर आलंय, असा दावा माजी महसूलमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. तसेच, जनतेला दिलेली आश्वासनं पाळल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केलाय. दिल्लीतील ‘चाणक्य’ संस्थेच्या माध्यमातून भाजपने केलेल्या सर्व्हेमधून महाराष्ट्रातील भाजपच्या 6 खासदार आणि 50 आमदारांची कामगिरी निराशाजनक असल्याचे समोर आले. ‘चाणक्य’च्या सर्व्हेतून जनतेला प्रश्न विचारण्यात आला की, “एकनाथ खडसे यांना पुन्हा आमदार बनवू इच्छित आहात का?” या प्रश्नाला 51 टक्के लोकांनी ‘होय’ असे उत्तर दिले, 41 टक्के लोकांनी ‘नाही’ असे उत्तर दिले, तर 8 टक्के लोकांनी ‘माहित नाही’ असे उत्तर दिले. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्याबाबत जनतेच्या मनात सकारात्मक मत असल्याचे दिसून येत आहे.