राज्याचे मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण ! पुणे विभागात होणार प्रतिदिन 200 टन ऑक्सिजन निर्मिती, 16 नवीन प्रकल्पांचा प्रस्ताव

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवला. ऑक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. ऑक्सिजनचा तुटवडा कमी करण्यासाठी इतर राज्यातून ऑक्सिजन मागवण्याची वेळ राज्यावर आली. आगामी काळात राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा होऊ नये यासाठी राज्य सरकारकडून महत्त्वाचे पाऊल उचललं जात आहे. याचाच एक भाग म्हणून पुणे विभागात येत्या काळात ऑक्सिजन निर्मितीचे (Oxygen Production) 16 नवीन प्रकल्प उभारले जाणार आहेत. हे प्रकल्प उभारण्याची प्रक्रिया सुरु झाली असून ऑक्सिजन निर्मितीचे (Oxygen Production) प्रकल्प निर्धारित वेळेत सुरु झाल्यास त्यांना भांडवली खर्चासाठी 10 ते 20 टक्के अनुदान देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे.

पुणे विभागात हे नवीन प्रकल्प सुरु झाले तर आगामी काळात राज्याचा ऑक्सिजनचा प्रश्न सुटणार आहे. या नवीन प्रकल्पातून प्रतिदिन जवळपास 200 मेट्रीक टन ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. दररोज 25 ते 50 टन ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लँट 31 डिसेंबरपर्यंत आणि 50 टन प्रतिदिन किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेचे प्रकल्प पुढील जूनपर्यंत कार्यान्वित झाल्यास त्यांना भांडवली खर्चात 10 ते 20 टक्के अनुदान देण्याचा सरकारचा मानस आहे. हे कमाल अनुदान 5 ते 10 कोटी रुपये इतके असेल.

राज्याचे मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण

राज्याची ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्यासाठी ऑक्सिजन प्रकल्पांची संख्या वाढवण्यात येत आहे. यासाठी राज्य सरकारने मिशन ऑक्सिजन स्वावलंब धोरण तयार केले आहे. यामध्ये उद्योगांना ऑक्सिजन तयार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. तसेच अनेक प्रकारच्या सवलती देण्यात आल्या आहेत. यामुळे पुढील 7 ते 9 वर्षात प्रकल्पाचा एकूण खर्च वसुल होऊ शकतो. कोरोना स्थितीमुळे ऑक्सिजन प्रकल्पांची संख्या वाढण्यास पोषक वातावरण निर्माण झाल्याचे सुतोवाचही राज्य सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

या ठिकाणी उभारणार ऑक्सिजन प्रकल्प

राज्य सरकाराच्या वतीने पुणे विभागात विविध ठिकाणी हे 16 ऑक्सिजन प्रकल्प उभारले जात आहेत. मिशन ऑक्सिजन अंतर्गत जेजुरीमध्ये दोन ऑक्सिजन प्रकल्प उभारले जाणार आहेत. याशिवाय यवत, मरकळ आणि शिवणे या ठिकाणी प्रत्येकी एक प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यात प्रत्येकी तीन प्रकल्प उभारले जाणार आहेत. तर सांगलीमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे दोन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

 

Also Read This : 

 

भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नेटकऱ्यांचे प्रत्युत्तर, म्हणाले – ‘ताई, तेथील आमदार तुमच्या भाजपचेच’

 

Scars Removal : चेहर्‍यावरील जखमेच्या खुणांमुळं चिंतीत आहात ?, ‘हे’ घरगुती उपाय करा, जाणून घ्या

 

Pune : दुचाकी दुरुस्त करुन देण्यास दिला नकार, तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन खून

 

मल्टीविटामिनने भरलेल्या शेवग्याच्या भाजीचे ‘हे’ आश्चर्यकारक फायदे; Drumstick चे फुलं, पानं अन् साल देखील खुपच फायद्याची, जाणून घ्या

 

दुर्दैवी ! मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून 8 गाभण मेंढ्या ठार तर 16 जखमी

 

विलायचीचं अधिक सेवन पडू शकतं महागात, ‘या’ आजारांचे होऊ शकता शिकार, जाणून घ्या