‘ते’ प्रमाणपत्र सादर करण्यास नगरसेवकांना ६ महिन्यांची मुदतवाढ

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल करण्यास असमर्थ ठरल्यामुळे नगरवेवकपद धोक्यात आलेल्या राज्यातील अनेक नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिने मुदत वाढीचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच अद्यादेश काढण्यात येणार आहे. यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत आरक्षित जागेवरुन निवडून आलेल्या आणि विहित मुदतीत जात प्रमाणपत्र सादर न केलेल्या भाजपच्या चार नगरसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोल्हापूर महापालिकेत आरक्षित जागेवरून निवडून आलेल्या नगरसेवकांनी सहा महिन्याच्या मुदतीमध्ये जात प्रमाणपत्र सादर केले नव्हते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने १९ नगरसेवकांचे पद रद्द केले आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यातील महापालिकेतील विहित मुदतीत जात पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवकांची पदे थोक्यात आली होती. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाकडे प्रमाणपत्र सादर न करणा-या नगरसेवकांची माहिती देखील मागवून घेतली होती.

महापालिकेच्या फेब्रुवारी २०१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर कुंदन गायकवाड हे चिखली प्रभाग क्रमांक एक-अ या राखीव जागेवरुन निवडून आले आहेत. तर, भोसरी धावडेवस्ती, भगतवस्ती प्रभाग क्रमांक सहा एक-अ या राखीव जागेवरुन निवडून आलेल्या नगरसेविका यशोदा बोईनवाड या दोन्ही नगरसेवकांनी दीड वर्ष होत आले तरी जातप्रमाणपत्र सादर केले नव्हते. यांना मोठा दिलासा मिळाला असून जात प्रमाणपत्र सादर करण्यास आणखीन सहा महिने मुदतवाढ दिली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्षांसमोर पेट्रोलच्या दराबाबत प्रश्न विचारणे पडले महागात

तर, प्रभाग क्रमांक २३ एक – अ शिवतीर्थनगर, समर्थनगर, केशवनगर प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका मनीषा पवार आणि प्रभाग क्रमांक १३ निगडी गावठाण, यमुनाननगर एक – अ मधून आरक्षित जागेवरुन निवडून आलेल्या कमल घोलप यांनी जात प्रमाणपत्र सहा महिन्याची विहित मुदत संपल्यानंतर सादर केले होते. मुदतवाढ दिल्यामुळे यांच्या पदाला कोणताही धोका नाही.

[amazon_link asins=’B06Y4PW2LL,B073FKXQ9H’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’44cba14e-bb30-11e8-9cf6-2d7ac731bdd4′]