देशाची अवस्था हुकूमशाहीकडे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा केंद्रावर ‘निशाणा’

लासलगाव – शेतकरी व कामगार विरोधी कायदे केल्याने बाजार समित्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार आहे.या कायद्यामुळे आधारभूत किमतीने माल खरेदी केला जाणार नसून आधारभूत किंमत हा विषय संपणार आहे .यामुळे स्वतः धान्य दुकानाचा विषय संपून जाईल. जे गरिबाला दोन रुपये किलोने धान्य मिळते ते धान्य मिळणे बंद होईल. केंद्र सरकारने शेतकरी व कामगार विरोधी कायदे जे लागू केले आहेत ते मागे घेण्यासाठी राज्यात काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलनाचा प्रारंभ आशिया खंडातील नावाजलेल्या लासलगाव बाजार समितीत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

या प्रसंगी ना थोरात बोलले की,देशाची वाटचाल हुकुमशाही कडे सुरू असून उत्तर प्रदेश मधील महिला सुरक्षित नाही तेथील गुंडाराज वाढत चालल्याने तेथील सरकार बरखास्त करण्याची वेळ आली असल्याचे म्हणाले. या निर्णयामुळे मोठ्या व्यापाऱ्यांना ताकद देण्याचा प्रकार हा केंद्र सरकार करत आहे .यांमुळे अदानी अंबानी सारख्या मोठ्या उद्योजकांना मोठे करण्याचा प्रयत्न आहे. महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी सांगावे वाटते की पुन्हा एकदा देश स्वतंत्र करण्याची गरज निर्माण झाली आहे केंद्राच्या हुकूमशाही मूळे लोकशाही ते मतदानाच्या हक्क डुबवण्याचे चे काम सुरू आहे.

यावेळी काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष सत्यजित तांबे, जिल्हा अध्यक्ष तुषार शेवाळे,हिरामण खोतखर, माजी खासदार उल्हास पाटील, नाशिक शहर अध्यक्ष शरद आहेर, मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर,राजाराम पानगव्हाणे, गुणवंत होळकर,राहुल दिवे, ,प्रसाद हिरे,जयश्री मदनराव पाटील, राजेंद्र मोगल ,अनिल आहेर, ,पंढरीनाथ थोरे,शिरीष कोतवाल,जगदीश होळकर,सचिन होळकर,राजाभाऊ शेलार,दिगंबर गीते,रमेश कहांडळ ,भैया देशमुख,प्रकाश अडसरे,साहेबराव ढोमसे,मधुकर शेलार,डॉ.विकास चांदर, ज्ञानेश्वर पाटील, अस्विनी बोरस्ते,भाऊसाहेब आजबे,स्वप्नील पाटील,सुरेश कुमावत,मिराण पठाण,महेश बाफना आदी मोठ्या संख्यने उपस्थित होते.