CM ममता दिदींकडून सुरक्षिततेचा ‘भरोसा’, डॉक्टरांचा संप मागे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील आठवडाभर कोलकत्ता येथे चालू असणारे इंटर्न जाणीव निवासी डॉक्टरांचे आंदोलन अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. या आंदोलनाचे लोण देशभर पसरले असून आज (दि. १७) रोजी संपूर्ण देशातील डॉक्टरांनी संप पाळला होता. दरम्यान आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी डॉक्टरांशी झालेल्या बैठकीनंतर दवाखान्यामधील डॉक्टरांच्या सुरक्षेसंदर्भात आणि इतर आश्वासने दिल्यानंतर डॉक्टरांच्या प्रतिनिधींनी आंदोलन मागे घेत असल्याचे घोषित केले. कोलकत्ता येथील नाबन्ना येथे हि बैठक पार पडली.

इंडियन मेडिकल असोसिएशनने कोलकत्ता येथील डॉक्टरांच्या मारहाणीच्या प्रकरणानंतर आज १७ जून ला देशभरातील डॉक्टरांना संप ची हाक दिली होती. त्यानंतर आज सकाळपासूनच देशातील विविध ठिकाणांहून डॉक्टर संपामध्ये उस्फुर्तपणे सामील झाल्याचे दिसून आले. दिल्लीस्थित AIIMS चे डॉक्टर दुपारी १२ पासून संपामध्ये सामील झाले. याचबरोबर राजस्थान, गुजरात, त्रिपुरा, आसाम, ओडिसा इत्यादी सर्वच राज्यांतून डॉक्टर आंदोलने करत संपात सहभागी झालेले दिसले. देशातील जवळपास ६ लाखाच्या आसपास डॉक्‍टर संपात सहभागी झाल्यानंतर वैद्यकीय सुविधेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला.

देशभरातील डॉक्टरांचे आंदोलन तीव्र झाल्याचे पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास नबाना येथे डॉक्टरांच्या प्रतिनिधींच्या बैठकीसाठी पोहोचल्या. डॉक्टरांनी मागणी केल्यानुसार बैठक बंद खोलीत न होता माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर आणि कॅमेऱ्यासमोर करण्याची विनंती सुद्धा ममतांनी मान्य केली होती.

ANI twit link : https://twitter.com/ANI/status/1140637048975441920?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1140637048975441920&ref_url=https%3A%2F%2Fwww.amarujala.com%2Findia-news%2Fdoctors-strike-live-updates-aiims-joins-ima-protest-talks-will-held-with-mamata-banerjee-today

नेमक्या कोणत्या मागण्या मान्य झाल्या :

– डॉक्टरांच्या मागणीनुसार प्रत्येक सरकारी दवाखान्यात एक तक्रार निवारण केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

– बैठकीनंतर ममतांनी कोलकत्त्याचे पोलीस कमिशनर अनुज शर्मा यांना प्रत्येक दवाखान्यासाठी एक पोलीस निकाल अधिकारी तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.

काय म्हणाले डॉक्टरांचे प्रतिनिधी बैठकीनंतर :

बैठकीनंतर कोलकत्याच्या एनआरएस मेडिकल कॉलेज च्या डॉक्टरांनी म्हटले कि, “आम्ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचे आभार मानतो. अनेक दिवसांच्या लढ्यानंतर आज ममता बॅनर्जींनी आमच्या मागण्या मान्य केल्या आहे. आम्ही अपेक्षा करतो कि या सर्व मागण्या वेळेत पूर्ण होतील. याचबरोबर आम्ही या लढ्यात आम्हाला साथ देणारे सर्वसामान्य लोक, सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ डॉक्टर तसेच वैद्यकीय सुविधेशी निगडित सर्व लोकांचे आभार मानतो.”

राज्यपालांनी केले निर्णयाचे स्वागत :

डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतल्याच्या निर्णयाचे राज्यपाल केशरी नाथ त्रिपाठी यांनी स्वागत केले. राष्ट्रपती भवनातून आलेल्या प्रतिक्रीयेनुसार, “राज्यपाल डॉक्टरांच्या हिंसा प्रकरणानंतर आणि त्यानंतर झालेल्या निर्माण झालेल्या गंभीर परिरिस्थितीनंतर निघालेल्या तोडग्यावर समाधानी असून बैठकीतून चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. आता डॉक्टरांनी रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ आपल्या कामावर रुजू व्हावे आणि सरकारने देखील दिल्या गेलेल्या आश्वासनांची लवकर पूर्तता करावी.”

आरोग्यविषयक वृत्त (www.arogyanama.com)

रात्री २ विलायची खाऊन १ ग्लास गरम पाणी प्या ; होईल ‘ही’ कमाल

हळदीचे ‘हे’ दोन फेसपॅक वापरून तुम्ही दिसाल तजेलदार

एक कप ग्रीन टी नियमित घेतल्यावर होतील ‘हे’ चमत्कारिक फायदे

केस का गळतात? कारणे जाणून करा सोपे घरगुती उपाय

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like