ST महामंडळ आता सुरु करणार पार्सल अन् कुरीअर सेवा, उत्पन्न वाढीसाठी घेतला निर्णय; वार्षिक 500 कोटींच्या उत्पन्नाचे उद्दिष्ट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य परिवहन महामंडाळाने (State Transport Corporation) मालवाहतूक सेवेनंतर आता उत्पन्न वाढविण्यासाठी पार्सल अन् कुरिअर (Parcel and courier) सेवा सुरू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या एसटी (ST) गाड्यांच्या माध्यमातून पार्सल अन् कुरिअर पोहोचवले जाणार आहे. राज्यभरातील बसस्थानकावर आता कोणीही पार्सल कुरिअर घेऊन गेल्यानंतर त्यांचे पार्सल, कुरिअर (Parcel and courier)  दुसऱ्याच दिवशी संबंधित व्यक्तीला मिळणार आहे. मात्र कुरिअर सेवा ही केवळ गावखेड्यापर्यंतच असेल की, ती डोअर टू डोअर (Door to door) असेल, याबाबत अद्याप निर्णय झाला नाही. पार्सल व कुरिअरच्या माध्यमातून एसटीने वर्षाला 500 कोटीचे उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. एसटीचे संपूर्ण राज्यात नेटवर्क (Network) आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

कोरोना काळात (During the Corona period) एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी एसटीकडे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत एसटी बसचे ट्रकमध्ये रुपांतर करून मालवाहतुकीचा प्रयोग यशस्वी करून दाखविला. त्यामुळे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Managing Director Shekhar Channe) यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक पार्सल आणि कुरिअर सेवेचा अभ्यास करत आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे एसटी (ST of Uttar Pradesh) महामंडळाचा आधार घेतला जात आहे. उत्तर प्रदेश महामंडळ 70 टक्के प्रवासी वाहतूक आणि 30 टक्के अन्य माध्यमांतून उत्तन्न मिळवते. त्याच धर्तीवर ही सेवा सुरु केली जात आहे. एटीच्या राज्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण भाग खेड्यापाड्यांत मिळून 600 जागा स्वतःच्या मालकीच्या आहेत. या जागेचा या सेवेसाठी वापर केला जाणार आहे.

याबाबत एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणाले की, पार्सल अन् कुरिअरची (Parcel and courier) आमची योजना अंतिम टप्प्यात आहे. कुरिअर सेवा डोअर टू डोअर देण्याबाबतचा निर्णय अद्याप झाला नाही. येत्या काही दिवसांत तो निर्णय होईल. लवकरात लवकर ही सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

एसटी फायद्यात राहण्यासाठी त्यांना उत्पन्नाचे अन्य मार्ग शोधून त्याची अंमलबजावणी करावीच लागेल. कुरिअर सेवेतून एसटीला चांगले उत्पन्न मिळेल. त्यामुळे आर्थिक उत्पन्नात वाढ होईल, असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे (Congress General Secretary Shrirang Barge) म्हणाले.

Wab Title :- State Transport Corporation now start courier service

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

फुफ्फुसांची होतेय समस्या ! कोरोनातून बरे झालेले रूग्ण पुन्हा हॉस्पिटलमध्ये होताहेत दाखल, डॉक्टरांची वाढली चिंता

मुंबई : 12 तासानंतर विहिरीतून काढण्यात आली ‘ती’ गाडी, असे केले रेस्क्यू; पहा व्हिडीओ

Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये जमा करा केवळ 95 रुपये आणि मिळतील 14 लाख, जाणून घ्या कसे?

इस्त्रायलमध्ये नवीन सत्ता ! 12 वर्षानंतर बेंजामिन नेतन्याहू यांना निरोप, नफ्ताली बेनेट बनले नवीन पंतप्रधान

 

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा