12 वी चा निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  इयत्ता 12 वी निकाल उद्या दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाइन पाहयाला येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या www.maharesult.nic.in वेबसाईटवर पहावे.

राज्यात कोरोना व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणे वाढत असतानाच महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी एज्युकेशन बोर्ड 12 वी इयत्तेच्या परीक्षेच्या निकालांची घोषणा करण्याची तयारी करत आहे. इयत्ता 12 वी निकाल उद्या (16 जुलै) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. अशात परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांनी बोर्डाची ऑफिशियल वेबसाइट www.maharesult.nic.in वर लेटेस्ट अपडेट चेक करत राहावे. कोणत्याही माहितीसाठी केवळ ऑफिशियल वेबसाइटवर विश्वास ठेवावा.

महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अ‍ॅण्ड हायर सेकंडरी एज्युकेशनने 12 वी ची परीक्षा लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी घेतली होती.

महाराष्ट्र बोर्ड रिझल्ट :

महाराष्ट्र बोर्ड दरवर्षी फेब्रुवारी – मार्च महिन्यात 12वी (एचएससी) ची परीक्षा घेते. या वर्षी 13 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 12वीची परीक्षा दिली आहे.

काय आहेत मागच्या वर्षीचे आकडे

महाराष्ट्र बोर्डाकडून निकाल कधी जाहीर होत आहेत, याची वाट विद्यार्थी पाहात आहेत. मागच्या वर्षी 2019 महाराष्ट्र बोर्ड 12 वी मध्ये 85.88 टक्के विद्यार्थी पास झाले होते. 12 वीत सुद्धा मुलींचा निकाल जास्त होता. 90.25 टक्के मुली तर 82.40 टक्के मुले पास झाली होती. 4470 विद्यार्थ्यांनी 90 टक्के गुण मिळवले होते. कोकणची कामगिरी सर्वोत्कृष्ट होती. तर नागपुरची कामगिरी सर्वात खराब होती. स्ट्रीम वाईज पास टक्केवारी पाहिली तर आर्टसमध्ये 76.45 टक्के, सायन्समध्ये 92.60 टक्के आणि कॉमर्समध्ये 88.28 टक्के विद्यार्थी पास झाले.

महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2020 :

महाराष्ट्र बोर्डाने एसएससीप्रमाणेच मागच्या वर्षी एचएससी परीक्षेचे निकाल जाहीर केले होते. बोर्डाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार, एकुण 14,21,936 विद्यार्थी परीक्षेसाठी उपस्थित होत, ज्यापैकी सुमारे 10.5 लाख विद्यार्थी पास झाले होते.

result

हे आकडे पाहा

एकुण विद्यार्थ्यांची संख्या : 14,21,936

उत्तीर्ण विद्यार्थ्यांची एकुण संख्या : 10.5 लाख

एकुण पास – 85.88%

मुली – 90.25%

मुले – 82.40%

एकुण उपस्थित विद्यार्थी – 1421936

एकुण उत्तीर्ण- 12,21,169

सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारा जिल्हा – कोंकण 93.23% पास

महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल 2020 : येथे करा चेक

निकाल ऑफिशियल वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in वर जाहीर करण्यात येतील. विद्यार्थ्यांनी याच वेबसाइटवर निकाल पाहायचा आहे. यासाठी ऑफिशियल वेबसाइटवर लॉगइन केल्यानंतर होमपेजवर रिझल्टची लिंक असेल. आता रिझल्टवर क्लिक करून इयत्ता निवडा. यानंतर समोर एक नवीन पेज ओपन होईल. येथे आपला लॉगइन क्रेडेन्शियल म्हणजे रोल नंबर, रोल कोड इत्यादी सबमिट करा. आता तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल. तो सबमिट केल्यानंतर विद्यार्थी आपले विषयानुसार गुणसुद्धा पाहू शकतात. विद्यार्थ्यांना आपल्या निकालाची प्रिंटआऊट घेतल्यानंतर सॉफ्ट कॉपीसुद्धा सेव करावी.

www.maharesult.nic.in 2020