लासलगावातील मूलभूत नागरी समस्येबद्दल शहर विकास समिती तर्फे निवेदन

लासलगाव- येथील मूलभूत नागरी समस्यांबद्दल नुकतेच लासलगाव शहर विकास समिती तर्फे उपविभागीय अधिकारी डॉ अर्चना पठारे तसेच गटविकास अधिकारी संदीप कराड, पंचायत समिति उपसभापती संजय शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले.

लासलगाव शहराचा परिसर हा मोठ्या प्रमाणातील वर्दळीचा परिसर असून पंचक्रोशी ही शेतकरी आणि व्यापारी वर्गाची आहे मात्र गेल्या काही वर्षांपासून लासलगावातील नागरिकांच्या मूलभूत नागरी समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे यासाठी लासलगावातील तरुणांनी लासलगाव शहर विकास समिती स्थापन केली असून त्याअंतर्गत नुकतेच अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदरची समितीही ही कोणत्याही राजकीय पक्षाची नसून समितीत सर्व राजकीय पक्षाच्या तरुणांचा सहभाग आहे आणि लासलगाव शहराचा विकास होण्यासाठी समिती कार्यरत आहे.

सदर निवेदनानुसार लासलगाव येथील दैनंदिन व्यवहार तसेच दुकाने रविवारी बंद असल्याने अनेकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे अनेक व्यापाऱ्यांमध्ये सदरचा बंद हा शासकीय असल्याचा संभ्रम असल्याने दंडाच्या अथवा कारवाईच्या भीतीपोटी दुकाने उघडण्यास घाबरत आहे मात्र सदरचा बंद हा स्वयंस्फूर्तीने केलेला होता यापुढे रविवारी देखील सर्व दुकाने खुली राहून सर्व व्यवहार सुरळीत होणे आवश्यक आहे.

लासलगाव परिसरात स्टेशन रोडवरील खैरे कॉम्प्लेक्स, गुरुद्वारा या परिसरात विंचुर प्रकाशा महामार्गावर रस्त्याच्या कडेला भाजीपाल्याची सध्या विक्री होत आहे त्यामुळे वाहतुकीसाठी अनेक अडथळे निर्माण होतात त्या ठिकाणी खूप मोठी गर्दी होते वर्दळीचा रस्ता असल्याने छोटे- मोठे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जाते अनेकदा अशा स्वरूपाचे अपघात यापूर्वी झाले आहेत या सर्व बाबींची दखल घेऊन सदरची भाजीपाला विक्री व्यवस्थाही ग्रामपंचायत ने ठरवून दिलेल्या पूर्व नियोजित जागेवर होणे आवश्यक आहे

या प्रसंगी सचिन आत्माराम होळकर, प्रकाश पाटील, प्रवीण कदम, बबनराव शिंदे, धर्मेश जाधव, प्रमोद, पाटील संदीप उगले, महेश मोरे, महेश बकरे, मयूर झांबरे, अमोल कुमावत, सुरेश कुमावत, सुहास कोल्हे, विकास कोल्हे, राजेंद्र कराड, महेंद्र हांडगे, विजय कचरे, अनिल आब्ब्बड़, सलीम सय्यद आदी उपस्थित होते