लासलगाव शहर विकास समिती कडून विद्युत वितरण कंपनीस निवेदन

लासलगाव, पोलीसनामा ऑनलाइन- येथील शहर विकास समिती कडून महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अभियंत्यास नुकतेच वितरण संबंधी असणाऱ्या समस्यांबाबत निवेदन सादर केले गेल्या अनेक वर्षांपासून लासलगाव शहरातील नागरिकांना विद्युत वितरण संबंधित तसेच वाढीव बिलासंदर्भात अनेक समस्या भेडसावत आहे यासाठी उपकार्यकारी अभियंता सोनवणे यांना समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले

निवेदनानुसार लासलगाव शहरातील विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचारी ग्राहकांना सेवा देण्यासाठी कार्यालयात उपस्थित नसतात तसेच दिलेल्या तक्रारीचा तात्काळ निवारण होत नाही याशिवाय ग्राहकांना उडवाउडवीचे उत्तर दिले जातात, दुकानदार व्यवसाय आणि निवासी यांना सध्या मोठ्या प्रमाणात अवास्तव बिल प्राप्त झाल्याने ग्राहकांमध्ये असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे विद्युत वितरण कंपनीकडून मिटर रिडींग घेताना एजन्सीकडून मोठ्या प्रमाणात चुका होतात त्यामुळे ग्राहकांना चुकीचे दिले जातात तसेच शेती पंपाच्या मीटरचे रीडिंग घेतले जात नाही याशिवाय निर्धारित वेळेत रिडींग घेतले जात नाही लासलगाव शहरातील जीर्ण झालेले जुने पन्नास-साठ वर्षांपूर्वी चे पोल आहेत हे पोल तात्काळ बदलण्याची गरज असल्याचं समितीने नमूद केले शहरातील विद्युत वाहक तारा अनेक ठिकाणी झाडांमध्ये आटलेल्या असल्याचे तसेच डीपी जवळ असणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील समितीने केली अनेक डीपी वरील तसेच इतर अनेक गोष्टी निकृष्ट दर्जाच्या झाले आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी अपघात होऊ शकतात त्यासाठी त्वरित डीपी बदलण्याची गरज आहे अनेक भागांमध्ये डीपीच्या मर्यादेपेक्षा जास्त विद्युत कनेक्शन आहेत त्यामुळे लो होल्टेज चा नागरिकांना सामना करावा लागतो घरगुती उपकरणे तसेच शेतीपंपाचे देखील यामुळे नुकसान होते या व इतर अनेक समस्या चा पाढा समितीने उपकार्यकारी अभियंता सोनवणे यांच्यासमोर वाचला सर्व समस्यांचे निराकरण त्वरित न झाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन करण्यात येईल असे समितीच्या वतीने सांगण्यात आले

या प्रसंगी समितीच्यावतीने सचिन आत्माराम होळकर प्रकाश सर्जेराव पाटील, विकास कोल्हे, प्रवीण कदम, देवेंद्र भावसार, महेश मोरे ,धर्मेश जाधव ,बबन शिंदे ,संदीप उगले, मयूर झांबरे ,राजेंद्र कराड, अफजल शेख, राजेंद्र जाधव, महेश बकरे, महेंद्र हांडगे, ललित पानगव्हाणे, रोहित पाटील, संदीप गांगुर्डे ,शरद साबळे हर्षद नागरे, सुरेश कुमावत, अनिल आब्बड़, मनोज होळकर आदी उपस्थित होते

You might also like