शेतमाल नुकसानीचे पंचनामे तात्काळ व्हावे यासाठी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांना निवेदन

लासलगाव – ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह शनिवारी (दि.१९) सायंकाळी शहर व परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. क्षणार्धात मुसळधार सरी कोसळू लागल्याने शेतमालाचे मोठे नुकसान आहे. शेतकरी पुन्हा अस्मानी संकटाने बेजार झाला आहे.यासाठी पं स माजी सभापती शिवा सुरासे आणि शिष्टमंडळाने मालेगाव येथे महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री नामदार दादासाहेब भुसे यांची भेट घेऊन काल झालेल्या वादळी पावसाने शेतीमालाचे झालेले नुकसाची तात्काळ पंचनामे करून तसेच पीक विम्याचे तातडीने पैसे शेतकऱ्यांना मिळावे आणि नुकसानीची भरपाई मिळावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले

याप्रसंगी निफाड पंचायत समितीचे माजी सभापती शिवा सुराशे, टाकळी विंचुर विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन ईश्वर शिंदे, रविराज शिंदे, रामदास वारुळे आणि उपस्थित शेतकरी