लासलगाव ग्रामीण रुग्णालयातील असुविधाबाबत मंत्री छगन भुजबळ यांना निवेदन

लासलगाव : पोलीसनामा ऑनलाइन –    येथील ग्रामीण रुग्णालयात व्हेंटिलेटर धुळकात पडलेले आहे तेथे रुग्ण व्हेंटिलेटर ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडत आहेत याबाबत पालकमंत्री नामदार छगनरावजी भुजबळ यांच्याकडे शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटलांनी गाऱ्हाणे मांडले

लासलगाव ग्रामीण रुग्णालय येथे कोव्हीड सेंटर १५ मार्च रोजी सुरू झाले होते. त्या ठिकाणी शासनाचे ७ व्हेंटिलेटर धुळकात पडलेले आहे तेथे रुग्ण व्हेंटिलेटर ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडत आहेत

पालक मंत्री नामदार छगनराव भुजबळ यांनी समक्ष ३ एप्रिल शनिवारी रोजी ३० बेड संख्या असलेले कोव्हीड सेंटर ग्रामिण रूग्नालय लासलगाव येथे येऊन पहाणी करून संबंधीत अधीकार्‍यांना सुचना केल्या तसेच २० बेड वाढवून व्हेंटिलेटर तत्काळ सुरू करण्याच्या आदेश दिले होते दहा दिवस झाले तरी देखील कुठलीही सुधारणा न होता उलट त्या मध्ये दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्या ठिकाणच्या वैद्यकीय अधीक्षकांना अतिरीक्त चार्ज असल्याने ते येथे उपस्थित नसतात त्यामुळे येथे कायमस्वरूपी अधीक्षक नेमण्यात यावा. वैद्यकीय अधीकारी देखील आजारी असल्याणे ते देखील उपस्थीत नसल्यामुळे रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे या मागणी बाबत शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी नामदार छगन भुजबळ यांना निवेदन दिले आहे.

यावेळी नामदार पालकमंत्री छगनराव भुजबळ यांनी वरील विषय गांभीर्यपूर्वक घेत शिष्टमंडळाला आश्र्वासित केले की इथून पुढे रुग्णांना सर्व सुविधा देण्यात येईल व शासनाच्या कोणत्याही सुविधांपासून रुग्ण वंचित राहणार नाही. असे आश्वासित केले या प्रसंगी शिष्टमंडळात युवासेना उपजिल्हाप्रमुख रविराज शिंदे, उपतालुकाप्रमुख सोमनाथ गांगुर्डे, मंदार खानापूरकर, ,राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य हरिश्चंद्र भवर जिल्हा सरचिटणीस बबनराव शिंदे ,सारोळ्याचे सरपंच दत्तोपंत डुकरे, युवा सेनेचे निशांत केंगे सोनू कोल्हे उपस्थित होते.