Unlock-4 : कंटेन्मेंट झोनच्या बाहेर Lockdown नाही लागू करू शकत राज्य, केंद्र सरकारची घ्यावी लागेल ‘मंजूरी’

नवी दिल्ली : अनलॉक-4 ची गाईडलाइन जारी झाली आहे. ही गाईडलाइन 1 सप्टेंबरपासून लागू होईल आणि लॉकडाऊनच्या सर्व तरतुदी रद्द होतील. केंद्र सरकार लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उघडण्याच्या प्रक्रियेत आहे. अनलॉक-4 चा एक महत्वपूर्ण दिशा-निर्देश हा आहे की, कंटेन्मेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन करण्याचा अधिकार राज्यांकडे असणार नाही. राज्य कोणत्याही स्थितीत स्थानिक स्तरावर कंटेन्मेंट झोनच्या बाहेर लॉकडाऊन लागू करू शकणार नाहीत.

मात्र, कंटेन्मेंट झोनच्या आत लॉकडाऊनच्या तरतूदींचे सक्तीने पालन केले जाईल आणि केवळ आवश्यक हालचालींना परवानगी असेल.

राज्यात कंटेन्मेंट झोन कुठे-कुठे आहे, याची माहिती प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाइटवर राज्य किंवा केंद्र शासीत प्रदेश देतील. कंटेन्मेंट झोनची माहिती राज्य किंवा केंद्र शासीत प्रदेशांच्या आरोग्य मंत्रालयांना सुद्धा द्यावी लागेल, जेणेकरून आवश्यकता भासल्यास तेथे मेडिकल सेवा पाठवता येतील आणि तेथे देखरेख ठेवता येईल.

गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, राज्य कंटेन्मेंट झोनच्या बाहेरच्या क्षेत्रात केंद्राच्या परवानगीशिवाय आपला स्थानिक बंद लागू करू शकत नाहीत.

7 सप्टेंबरपासून सुरू होणार मेट्रो
गृह मंत्रालयाच्या दिशा-निर्देशानुसार, 7 सप्टेंबरपासून मेट्रो टप्प्याटप्प्याने सुरू होऊ शकते. निवास आणि शहरी प्रकरणाचे मंत्रालय/रेल्वे मंत्रालयाद्वारे केंद्रीय गृह मंत्रालयासोबत विचारविनिमयानंतर मेट्रो रेल्वे 7 सप्टेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिली जाईल.

सोबतच केंद्राने ही गोष्टसुद्धा पुन्हा सांगितली आहे की, एका राज्यातून दुसर्‍या राज्यात जाण्या-येण्यास कोणताही प्रतिबंध असणार नाही आणि कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही. हे यासाठी महत्वाचे आहे, कारण केंद्राच्या सूचनेनंतर सुद्धा काही राज्यांनी आपल्या येथे प्रवासाला प्रतिबंध लावले होते.

अटींसह राजकीय रॅलीना परवानगी
केंद्राने बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय कामे आणि सभांसाठी 21 सप्टेंबर 2020 पासून 100 व्यक्तींना सहभागी होण्याची परवानगी दिली आहे. मात्र, अशा कार्य्रकमांमध्ये फेस मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंग, थर्मल स्कॅनिंग आणि हात धुणे आवश्यक असणार आहे.