Coronavirus : ‘लॉकडाऊन’चं उल्लंघन केल्यास सरकारकडून ‘कडक’ कारवाई, होऊ शकते 6 महिन्याची ‘जेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत देशात 428 संक्रमित समोर आले आहेत त्यामुळे खबरदारी म्हणून देशातील 80 जिल्हे लॉकडाऊन करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदींनी कोरोनामुळे रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. परंतु अनेक राज्यात अनेक लोकांकडून याचे पालन केले गेले नाहीत. पीएम मोदींनी यावर नाराजी व्यक्त केली. यानंतर केंद्र सरकारने राज्यांना सांगितले आहे की लॉकडाऊन कठोरपणे लागू करण्यात यावा आणि याचे पालन न केल्यास कायदेशीर कारवाई केली जावी.

सरकारने सांगितले, लॉकडाऊन दरम्यान आवश्यक सेवा देण्यात येतील, परंतु लॉकडाऊनचे पालन न केल्यास त्याविरोधात कारवाई करण्यात येईल. याअंतर्गत 6 महिन्यांचा तुरुंगवास देखील होऊ शकतो. तसेच 1000 रुपयांचा दंड देखील ठोठावला जाऊ शकतो किंवा हे दोन्ही. सोमवारी ही माहिती देण्यात आली.

केंद्र आणि राज्य सरकारने रविवारी देशभरात 80 जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यात कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची अनेक प्रकरण समोर आली आहेत. दिल्लीत 23 मार्चला सकाळी 6 वाजल्यापासून 31 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. या दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरु राहतील.

कुठे कुठे आहे लॉकडाऊन
केंद्र सरकारच्या आदेशानंतर दिल्लीशिवाय महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ, हरियाणा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंंगणा, नागालॅंड, जम्मू काश्मीर, झारखंड आणि राज्यस्थानमध्ये लॉकडाऊन केले गेले आहे. तर संपूर्ण पंजाबमध्ये सोमवारपासून कर्फ्यू लागू केला गेला आहे, राज्य सरकारने लोकांना बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. या दरम्यान फक्त निवडक सेवा सुरु राहतील.