पाकिस्तानमध्ये ‘या’ कारणावरून महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याची ‘तोडफोड’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानमधील पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे. दोन इसमांनी त्यांच्या पुतळ्याची तोडफोड केली असून या दोन जणांना किल्ल्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या हवाली केले. महाराजा रणजित सिंग यांनी पाकिस्तानमधील या प्रांतावर जवळपास चाळीस वर्ष राज्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, भारताने जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्याच्या रागातून हा हल्ला आणि तोडफोड करण्यात आली. नुकतेच भारताने जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले होते. लाहोर किल्ल्याजवळ हा पुतळा असून महाराजा रणजित सिंग यांच्या १८० व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. महाराजा रणजित सिंग यांचा मृत्यू हा १८३९ मध्ये झाला होता.

दरम्यान, महाराजा रणजित सिंग यांच्या पुतळ्याच्या तोडफोडप्रकरणी तेहरिक लाबाइक पाकिस्तान या मौलाना खादीम रिझवी यांच्या संघटनेच्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून या प्रकरणी लाहोर प्राधिकरणाने खेद व्यक्त केला असून याची लवकरात लवकर डागडुजी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त