स्टॅच्यू ऑफ युनिटी नं तोडलं स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं रेकॉर्ड, दिवसेंदिवस ‘दुप्पट’ होतीय ‘पर्यटकां’ची संख्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्टॅच्यू ऑफ यूनिटी या पुतळ्याला उभारून एक वर्ष उलटून गेल्यानंतर या पुतळ्याने 133 वर्षांपासून उभ्या असलेल्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचा विक्रम मोडला आहे. गुजरातमधील या स्मारकाला पाहण्यासाठी 15000 पेक्षा अधिक पर्यटक रोज येत आहेत. सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेड दिलेल्या माहितीनुसार 1 नोव्हेंबर 2018 पासून ते 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत पहिल्या वर्षी येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत 74 % नी वाढ झालेली आहे. आणि आता पर्यटकांची संख्या दिवसाला 15 हजारापेक्षा जास्त झाली आहे.

अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहण्यासाठी दिवसाला 10 हजार पर्यटक येतात. सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या 182 मीटर उंच पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ यूनिटी असे म्हंटले जाते. हा पुतळा नर्मदा नदीच्या किनाऱ्यावरील सरदार सरोवरापाशी बांधण्यात आलेला आहे. भारतीय मूर्तीकार राम वी सुतार यांनी याचे डिझाईन बनवलेले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबर 2018 ला या पुतळ्याचे अनावरण केले होते. पुतळ्याभवती बनवण्यात आलेल्या अनेक गोष्टीमुळे याठिकाणी दिवसेंदिवस पर्यटक वाढत असल्याचे मत सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडद्वारे व्यक्त करण्यात आले आहे. यामध्ये जंगल सफारी, न्यूट्रीशियन पार्क, कॅक्टस गार्डन, बटरफ्लाई गार्डन, एकता नर्सरी, नदी राफ्टिंग, बोटिंग अशा प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे.

सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडने सांगितले की, या अतिरिक्त सुरु केलेल्या गोष्टींमुळे पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. तसेच या वर्षी नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी आलेल्या पर्यटकांची संख्या ही 30,90,723 इतकी प्रचंड होती. तर यांच्याद्वारे सुमारे 85.57 कोटी रुपयांचा महसूल सरकारला उपलब्ध झाला आहे.

Visit : Policenama.com