‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’नं ‘कमाई’त ‘ताजमहल’ला टाकलं मागं, वर्षभरात ‘कमवले’ 63 कोटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंच प्रतिकृतीच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ने कमाईच्या बाबतीत ताजमहालला मागे टाकले आहे. देशभरातील ऐतिहासिक इमारतींची देखरेख करणाऱ्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण संस्थेने (आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया ASI) याबाबत माहिती दिली आहे.

ASI ने दिलेल्या माहितीनुर , जगातील सर्वोच्च स्टॅच्यू ऑफ युनिटीने एका वर्षात 63 कोटींची कमाई केली, तर ताजमहालने या काळात 56 कोटींची कमाई केली. ताजमहालच्या तुलनेत सरदार पटेल यांच्या पुतळ्याने एका वर्षात 7 कोटींपेक्षा जास्त कमाई केली.

कमाईच्या बाबतीत आग्रा किल्ला तिसऱ्या क्रमांकावर
कमाईच्या बाबतीत आग्रा किल्ला तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने एका वर्षात 30 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आणि चौथ्या क्रमांकावर दिल्लीचा कुतुबमीनार असून त्याने 23 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली. फतेहपूर सिक्रीने पाचव्या क्रमांकावर राहून 19.04 कोटी रुपये कमविले, तर लाल किल्ल्याने 16.17 कोटी रुपये कमावले.

कमाईत अग्रेसर असणारी पर्यटन स्थळे

स्मारक – कमाई (रुपये) – पर्यटकांची संख्या (कंसात)
(1) स्टॅच्यू ऑफ युनिटी – 63 कोटी – (24.44 लाख)
(२) ताजमहाल – 56 कोटी  – (64.58 लाख)
(3) आग्रा किल्ला – 30.55 कोटी – (24.98 लाख)
(4) कुतुब मीनार – 23.46 कोटी – (29.23 लाख)
(5) फत्तेपूर शिक्री – 19.04 कोटी – (12.63 लाख)
(6) लाल किल्ला – 16.17 कोटी – (31.79 लाख)

Visit : Policenama.com