home page top 1

‘या’ पद्धतीचा व्यायाम केल्यास पावसाळ्यातही राहाल ‘सशक्त’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – व्यायाम हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. वजन कमी करणे किंवा वाढवणे हा व्यायामाचा हेतू नाही. व्यायामामुळे शरीर आणि मन दोन्हीला मदत होते. तसेच मनाचा शीण जाण्यास आणि नवचैतन्य येण्यास मदत होते. त्यामुळे व्यायाम हा चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी गरजेचा आहे. पावसाळ्यात बाहेर मोकळ्यावर व्यायाम करणे कठीण होते. कधी चिखल, कधी तुंबलेले पाणी तर कधी जोरात आलेली पावसाची सर. पण अशावेळी आपण घरात किंवा जिममध्ये व्यायाम करू शकतो.

१) व्यायामाची सुरुवात सध्या सोप्या वॉर्म अप व्यायामाने, स्ट्रेचिंग व्यायाम प्रकाराने करा. ह्यामुळे सर्व सांधे आणि स्नायू मोकळे होतात. ह्यामुळे नंतर व्यायाम करताना स्नायूंचे दुखणे उद्भवत नाही.

२) घरातल्या घरात व्यायाम करताना जागच्याजागी जॉगिंग, दोरीच्या उड्या, उठाबशा, उभे राहून पायाचे अंगठे पकडणे असे व्यायामाचे प्रकार करावेत.

३) सूर्यनमस्कार घालणे हा अत्यंत उपयुक्त व्यायाम आहे. सुर्यानमस्कारामुळे शरीरातील सर्व अवयांना, सांध्यांना आणि स्नायुंना व्यायाम मिळतो. सूर्यनमस्कार घालताना आधी कृती नीट समजून घ्यावी. मग सूर्यनमस्कार घालावेत.

४) घरातील किंवा इमारतीतील जिने चढ उतार करणे हा देखील उत्तम व्यायाम आहे. पण व्यायाम म्हणून ठरलेला वेळ हा व्यायाम सतत करायला हवा.

५) घरातल्याघरात योग , प्राणायम करणे हा सुद्धा उत्तम पर्याय आहे. योगा आणि प्राणायामामुळे मन शांत होण्यासाठी सुद्धा छान मदत होते. शरीराचा रक्तप्रवाह उत्तम होतो. त्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यासदेखील मदत होते.

६) तुम्हाला जर डान्स करायला आवडत असेल तर एक तास मनसोक्त डान्स करा. डान्स करण्याने शरीराला तर उत्तम व्यायाम मिळतोच पण मन देखील प्रफुल्लीत होते.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like