निरोगी राहण्यासाठी दिवसभरात 5 ग्रॅम मीठाचे सेवन करा, WHO ची नवीन गाईडलाईन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यूएचओने जेवनातील मीठाच्या प्रमाणाबाबत नवीन गाईडलाईन जारी केली आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की, निरोगी राहण्यासाठी केवळ 5 ग्रॅम मीठ सेवन केले पाहिजे. मात्र, बहुतांश लोक आपल्या जेवणात याच्या दुप्पट मीठ वापरतात. आरोग्यासाठी मीठ किती आवश्यक आहे ते जाणून घेवूयात…

सोडियम आणि पोटॅशियमचा बॅलन्स आवश्यक
डब्ल्यूएचओने जगातील सोडियम लेव्हल बाबत बेंचमार्क सोडियम लेव्हल इन फूड तयार केला आहे, यामध्ये 60 पेक्षा जास्त फूड कॅटेगरीचा समावेश केला आहे. शरीरात पोटॅशियम आणि सोडियामची मात्रा संतुलित असणे आवश्यक असते. जास्त मीठ सेवन केल्याने ब्लड प्रेशर, हार्टची समस्या आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. हाडे कमजोर होतात.

या प्रॉडक्टमुळे शरीरात वाढते मीठ
प्रोसेस्ड फूड जसे की- पॅकेज्ड फूड, डेयरी आणि मांस प्रॉडक्ट्स, प्रोसेस्ड फूड, मसाले आणि नमकीन.

मीठाचे फायदे
मीठामुळे शरीर हायड्रेट राहते. थायरॉईडला ठिक करण्यासाठी उपयोगी आहे. ब्लड प्रेशर लो असल्यास मीठ खाल्ल्याने आराम मिळतो. सिस्टिक फायब्रोसिसच्या लक्षणात सुधारणा होते.

मीठाचे तोटे
जास्त मीठामुळे हार्टच्या आजारांचा धोका वाढतो. अतिप्रमाणात मीठ सेवन केल्यास स्ट्रोकचा धोका वाढतो. हाय बीपी होण्याची शक्यता वाढते. किडनीचे रोग होण्याची शक्यता वाढते.