Stealthing | ‘सेक्स’च्या दरम्यान गुपचुप कंडोम काढण्यावर ‘इथं’ बनवला कडक कायदा ! चर्चा सुरू, लोक म्हणाले – ‘कसे होणार सिद्ध?’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stealthing | अनेक प्रयत्न आणि चर्चेनंतर अखेर अमेरिकेच्या कॅलिफोर्निया (California, USA) मध्ये सेक्सशी संबंधीत एक कठोर नियम संमत करण्यात आला आहे. गव्हर्नर गेविन न्यूसम (Governor Gavin Newsom) यांनी त्या विधेयकावर हस्ताक्षर केले आहे, ज्यामध्ये पार्टनरची तोंडी संमती न घेता सेक्स दरम्यान कंडोम हटवणे (Stealthing) अवैध घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती (It is illegal to remove a condom during physical relation without the oral consent of the partner).

यासोबतच कॅलिफोर्निया अमेरिकेचे पहिले असे राज्य बनले आहे जिथे स्टील्थिंग बेकायदेशीर (stealthing illegal) बनवण्यात आले आहे. या कायद्याच्या अंतर्गत सेक्स वर्करसुद्धा आपल्या त्या ग्राहकांवर खटला दाखल करू शकतील जे सेक्सच्या दरम्यान सहमतीशिवाय कंडोम काढतील.

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, या कायद्यासाठी मोठ्या कालावधीपासून लढणार्‍या क्रिस्टीना गार्सिया (Christina Garcia) यांनी विधानसभेत हे बिल सादर करत म्हटले की, आम्हाला हेच ठरवायचे होते की, स्टील्थिंग (Stealthing) केवळ अनैतिक नसून, अवैध सुद्धा आहे. डेमोक्रॅटिक असेंब्लीच्या गार्सिया 2017 पासून अशा प्रकारच्या कायद्यासाठी पाठपुरावा करत होत्या.

गार्सिया सातत्याने यास गुन्हा ठरवत गुन्हेगारांना जेलमध्ये पाठवण्याची मागणी करत होत्या. मोठ्या संघर्षानंतर अखेर आता गार्सिया यांच्या बिलास मंजूरी मिळाली आहे. हा कायदा बिनविरोध मंजूर करण्यात आला.

या प्रस्तावानुसार, सहमतीशिवाय कंडोम काढणार्‍या आरोपीवर सिव्हिल कोड अंतर्गत गुन्हा दाखल करता येईल. यामध्ये पीडित आपल्या भरपाईसाठी आरोपीविरूद्ध खटला दाखल करू शकतो.

परंतु यापुढे गुन्हेगाराला आणखी कोणत्याही प्रकरची शिक्षा दिली जाऊ शकत नाही.
गार्सिया यांनी बीबीसीला सांगितले की, मला अजूनही वाटते की, हा कायदा दंडसंहितेत घेतला पाहिजे.
जर कुणी विना सहमती कंडोम काढला तर ते बलात्कार किंवा लैंगिक गुन्ह्याच्या श्रेणीत येत नाही का?

गार्सिया यांच्यानुसार स्टील्थिंगमुळे महिलांमध्ये सेक्स ट्रान्समिशन डिसीज आणि प्रेग्नंसीचा धोका असतो.
मात्र, कायदा संमत होण्यापूर्वी काही जाणकारांनी यावर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की,
या कायद्यांतर्गत खटला दाखल करण्यात अनेक प्रकारच्या अडचणी येऊ शकतात.
जसे की, पीडिताला हे सिद्ध करण्यासाठी खुप प्रयत्न करावे लागतील की आरोपीने सेक्सच्या दरम्यान जाणीवपूर्वक कंडोम हटवला किंवा तो चुकीने निघाला.

 

गार्सिया यांच्या बिलाचे मूल्यमापन करणार्‍या समितीने आपल्या विश्लेषणात स्टील्थिंग निराशाजनक प्रकारे सामान्य म्हटले आहे.
यासाठी अनेक प्रकारच्या संशोधनांचा संदर्भ सुद्धा दिला आहे.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये 2019 च्या एक स्टडीमध्ये आढळले होते की,
21 ते 30 वर्षाच्या 12% महिलांनी स्टील्थिंगचा अनुभव घेतला आहे.
2019 च्या अन्य एका संशोधनात आढळले की,
जवळपास 10% पुरुषांनी पार्टनरच्या सहमतीशिवाय गुपचुप कंडोम काढला.

गार्सिया यांनी म्हटले, मला अभिमान आहे की, कॅलिफोर्निया देशातील पहिले असे राज्य बनले आहे जिथे स्टील्थिंग बेकायदेशीर ठरवण्यात आले आहे.
परंतु मी इतर राज्यांना आवाहन करते की, त्यांनी सुद्धा लवकरात लवकर आपल्या राज्यांमध्ये हा कायदा आणावा.
सध्या हा एका राज्यात झाला आहे आणखी 49 ठिकाणी यास बेकायदेशीर घोषित करणे बाकी आहे.

 

Web Title :- Stealthing | stealthing california bans non consensual condom removal during physical relation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chitra Wagh | भाजपच्या चित्रा वाघ यांची ‘महाविकास’ सरकारवर घणाघाती टीका, म्हणाल्या – ‘कोरोनाची नाही राज्यात महिला अत्याचाराची लाट’

Pune Corporation | पुणे महापालिकेची शहर सुधारणा समिती झाली ‘अ‍ॅक्टीव्ह’ ! नियमांची ‘ओढाताण’ करून बोलविलेल्या खास सभेत ‘विषयांना’ मंजुरी

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3033 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी