Steel producer Shyam Metallics IPO : 14 जून रोजी फक्त 303 रुपये गुंतवा आणि करा चांगली ‘कमाई’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोलकातामधील (Kolkata) स्टील उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जी लिमिटेड हे (Shyam Metalics And Energy Limited) ग्राहकांसाठी एक खास संधी उपलब्ध करून देत आहे. अनेक लोक गुंतवणूक करण्यासाठी चांगला मार्ग शोधात असतात. परंतु श्याम मेटॅलिक्स (Steel producer Shyam Metallics) या कंपनीने ग्राहकांसाठी चांगला नफा देणारी संधी आणली आहे. ही खास संधी जूनमध्ये उपलब्ध आहे. तर, शेअर बाजारामध्ये ही कंपनी आयपीओ (Initial public offering) सादर करणार आहे. तर कंपनीने IPO साठी किंमत बँड फायनल केला आहे. तसेच, यामुळे पाहल्याच दिवशी ग्राहकाची कमाई होऊ शकणार आहे.

ही कंपनी (Steel producer Shyam Metallics) 14 जून रोजी 909 कोटी रुपयांची आयपीओ (Initial public offering) दाखल करणार आहे. मात्र, या प्रकरणासाठी 303 ते 306 रुपये प्रतिशेअर असा किंमत बँड निश्चित करण्यात आली आहे. तसेच, 14 ते 16 या तारखेदरम्यान यामध्ये ग्राहक पैशाची गुंतवणूक करू शकणार आहे. अँकर गुंतवणूकदारांसाठी 11 जून रोजी IPO खुला होणार असल्याचं देखील सांगितलं आहे.

विक्रीसाठी ऑफर –
स्टील उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जीचे (Steel producer Shyam Metallics) सार्वजनिक प्रकरण 657 कोटींचा असणार आहे.
तर Offer for Sale साठी कंपनी 252 कोटी रुपयांचे शेअर विक्रीसाठी दाखल करणार आहे.
तसेच, पात्र असणाऱ्या कामगारांना अंतिम सादरीकरण मूल्यावर प्रति शेअर प्रमाणे 15 रुपयांची सवलत दिली जाणार आहे.
विक्रीच्या ऑफरमध्ये शुभम कॅपिटलच्या माध्यमातून 37 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री, सुभम बिल्डवेलच्या 63 कोटी रुपये, कल्पतरु हाउसिंग अँड ट्रेडिंगच्या 25 कोटी रुपये, डोराईट ट्रॅकॉनच्या 30 कोटी रुपये आणि नारंतकच्या 97 कोटी रुपयांच्या शेअर्स विक्रीचा देखील यामध्ये समाविष्ट केला आहे.

निधी कुठे कसा वापरावा लागेल ?

> IPO द्वारे जमा झालेल्या 657 कोटीचा वापर कंपनी आणि तिची सहकारी कंपनी एसएसपीएलच्या कर्ज परतफेडीसाठी करणार आहे.

> या IPO साठी श्याम मेटॅलिक्सने आयसीआयसीआय सिक्युरिटीज, अ‍ॅक्सिस कॅपिटल, आयआयएफएल सिक्युरिटीज,
जे.एम. फायनान्शिअल आणि SBI कॅपिटल यांना आपले लीड मॅनेजर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

या कंपनीचा बिझनेस कसा आहे ?
स्टील उत्पादक कंपनी श्याम मेटॅलिक्स अँड एनर्जीचे ओडीशातील संबलपूर, पश्चिम बंगालमधील जमुरिया आणि मंगलपूर असे 3 कारखाने आहेत.
तसेच, कंपनीने 13 राजे आणि एक केंद्रशासित प्रदेश यात 42 वितरकांची टिम स्थापन करण्यात आली आहे.

या कंपनीवर कर्ज ?
स्टील उत्पादक कंपनीवर जवळपास एकूण 381.12 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
दरम्यान, कंपनीच्या सहकारी कंपनीवर 398.60 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
आणि या कंपनीवर एकूण 886.29 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

नफा –
> 2020-21 मधील डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा एकूण महसूल 3933.08 कोटी होता.

> गेल्या वर्षी याच कालावधी दरम्यान कंपनीचा एकूण महसूल (Total revenue) 3283.09 कोटी रुपये होता.

> श्याम मेटॅलिक्सला डिसेंबरच्या तिमाहीमध्ये 456.32 कोटीं रुपयांचा निव्वळ नफा (Net Profit) झाला.

> गेल्या अर्थिक वर्षातील तिमाहीमध्ये कंपनीचा निव्वळ नफा (Net Profit) फक्त 260.36 कोटी रुपये झाला होता.

Also Read This : 

 

खासगी बस अन् टेम्पोचा भीषण अपघात; 17 जणांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी

 

Health News : जांभळाचे ‘या’ वेळी करावे सेवन, ‘हे’ 5 फायदे जाणून व्हाल हैराण