खुशखबर… महागड्या परदेशी स्टेंटपासून होणार रुग्णांची सुटका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुग्णाला ह्रदयाचा त्रास असल्याचे सांगितले गेल्यावर त्याला अॅजिअोप्लास्टी करायला सांगितले जाते. तेव्हा छोटेसे आॅपरेशन असल्याचे डॉक्टर सांगतात. त्यानंतर प्रत्यक्ष आॅपरेशन सुरुवात झाल्यावर रुग्णाच्या आमुक आमुक ठिकाणी ब्लॉकेजेस आहेत. त्यामुळे तेथे स्टेंट बसवावे लागतील. काय करायचे तातडीने सांगा, आत आॅपरेशन सुरु आहे. त्याच्या स्टेंटच्या किंमती ऐकल्यावर सामान्यांना चक्कर येण्याचीच बाकी असते. त्यातल्या त्यात स्वस्त देशी स्टेंट बसवायची म्हटल्यावर डॉक्टर त्याची काही खात्री देता येत नाही म्हणून हात वर करतात. शिवाय रुग्ण हा जवळचा नातेवाईक असतो. उद्या आॅपरेशन झाल्यानंतर त्याला आपल्याला केवळ पैशाकडे पाहून यानी देशी स्टेंट बसविले असे समजल्यावर काय होईल, असा भावनिक प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे नाईलाजाने अव्वाच्या सव्वा पट महाग असलेले परदेशी स्टेंट बसविले जाते. त्याच्या खर्चाच्या बोज्याने ते सर्व कुटुंबच आर्थिक तणावात येते.
पण, आता असे होणार नाही. कारण परदेशी स्टेंट इतकेच देशी स्टेंट चांगल्या दर्जाचे असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले आहे. हे स्टेंट अमेरिकेन कंपनीच्या स्टेंट इतकीच चांगली आहेत आणि हे संशोधनही अमेरिकेत झाले आहे. त्यामुळे आता त्यावर येथील डॉक्टरांना प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाही.
गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला भारतीय स्टेंटबाबतचा वाद आता संपला आहे. कारण भारतीय स्टेंट हे परदेशी स्टेंटसारखेच चांगल्या दर्जाचे आहेत, असे एका शोधातून सिद्ध झाले आहे. भारतात तयार होणाऱ्या स्टेंट्सची क्वॉलिटी याबाबत गेल्या काही वर्षांपासून वादविवाद सुरु होता. पण आता एका नव्या अभ्यासानुसार, हे स्पष्ट झाले आहे की, भारतात तयार होणारे स्टेंट्स जगातल्या सर्वात चांगल्या स्टेंट्सपैकी आहेत. साधारण १० वर्ष यावर अभ्यास करण्यात आल्यावर याचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. या सांगण्यात आले आहे की, भारतीय स्टेंट्स यूकोन चॉइस पीसीची क्षमता ही स्टेंट मार्केटमध्ये सर्वात चांगल्या समजल्या जाणाऱ्या ऐबट या अमेरिकन कंपनीच्या झेइन्फेस स्टेंट इतकीच चांगली आहे.

८५ लाख शेतकऱ्यांना दुष्काळाचे चटके, सर्वाधिक झळ मराठवाड्याला 

शिकागोमध्ये झालेल्या अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या सायन्स सेशनदरम्यान जर्मनीच्या कार्डिओलॉजिस्ट्सने २ हजार ६०३ रुग्णांवर केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष सांगितले. यात रुग्णांवर उपचार २ जेनरेशन स्टेंटने केला गेला होता. एक होतं झेइन्फेस आणि दुसरं होतं यूकोन चॉइस. AHA नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या अभ्यासातून आढळले की, या स्टेंटच्या परिणामांमध्ये कोणत्याही प्रकारचा फरक बघायला मिळाला नाही.
फेब्रुवारी २०१७ मध्ये केंद्र सरकारने स्टेंटच्या किंमती नियंत्रित करण्याच्या उद्देशाने किंमती निश्चित केल्या होत्या. ज्यानंतर औषध सोडणाऱ्या स्टेंटची किंमत कमी झाली होती. त्यामुळे अनेक मल्टीनॅशनल कंपन्यानी भारतीय बाजारातून आपले स्टेंट परत घेण्याची धमकी दिली होती. त्यांचे म्हणणे होते की, त्यांचे स्टेंट भारतीय स्टेंटपेक्षा अधिक चांगले आहेत. त्यामुळे त्यांची किंमत अधिक असायला हवी. अनेक कार्डिओलॉजिस्ट्सनी भारतात तयार केलेल्या स्टेंट्सच्या क्वॉलिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पण आता नव्या शोधातून हे स्पष्ट झाले आहे की, भारतीय स्टेंटही परदेशी स्टेंटसारखेच चांगल्या दर्जाचे आहेत. यूकोन चॉइस स्टेंट भारतातच तयार केले जातात, पण जर्मन टेक्नॉलॉजीच्या मदतीने. तर भारतातीलच सुप्रा स्टेंट पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे आहे.
परदेशी कंपन्या हॉस्पिटल, डॉक्टरांना स्टेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशन देतात. त्यावर असलेल्या भरमसाठ किंमती एमआरपी म्हणून लावल्या जातात. याशिवाय त्यात हॉस्पिटल हाताळणी चार्जेस तसेच डॉक्टरांची फी भरमसाठ लावली जाते. त्यामुळे हॉस्पिटल आणि डॉक्टरही जादा कमिशनच्या आमिषाने रुग्णांना परदेशी स्टेंट लावण्याची जवळपास सक्ती करतात. त्यात रुग्ण व त्याचे नातेवाईक भरडले जातात. त्याविरोधात अनेक संस्थांनी वेळोवेळी आवाज उठविला होता.
आता डॉक्टरांना परदेशी स्टेंटच वापरा अशी सक्ती करताना येणार नाही. त्यामुळे त्यांना भरमसाट कमिशनला मात्र मुकावे लागणार आहे.
काय आहे स्टेंट?
स्टेंट हे छोटे एक्सपेंडेबल ट्यूब आहे. जे शरीरात आकुंचन पावलेल्या किंवा कमजोर झालेल्या धमन्यांच्या उपचारासाठी वापरले जातात. कोरोनरी आर्टरी डिसीज असलेल्या रुग्णांवर स्टेंटचा वापर आकुंचन पावलेल्या धमण्यांना मोकळे करण्यासाठी वापरले जातात. ज्यामुळे छातीत वेदना होणे कमी करण्यास मदत मिळते. तसेच हार्ट अटॅकचा उपचार करण्यासही मदत मिळते. स्टेंट हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. स्टेंटच्या किंमती सरकारने कमी केल्याने अनेक रुग्णांना दिलासा मिळाला आहे. कारण आधी याच्या किंमती फार जास्त असल्याने अनेकांना हा उपचार परवडत नव्हता.