अनैतिक संबंधातून सावत्र भावाचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन

नातेवाईक महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सावत्र भावाने दारु पाजून, डोक्यात दगड घालून भावाचा खून केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. आळंदी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’62b2f76b-bd96-11e8-a2c6-b38da7f5868c’]

संतोष शंकर थोरवे (४०, रा. चरोली)  याचा खून झाला आहे. तर पांडुरंग शंकर थोरवे (४४, रा. चरोली) याला अटक केली आहे. या प्रकरणी संतोषच्या पत्नीने तक्रार केली आहे. आळंदीचे वरीष्ठ निरीक्षकानी दिलेल्या माहितीनुसार संतोष आणि पांडुरंग हे दोघे सावत्र भाऊ आहेत. यांच्यात वाद सुरू होते. पांडुरंगच्या नातेवाईक महिले सोबत संतोषचे अनेतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून पांडुरंग याने कट आखला.

आळंदी-चाकण रस्त्यावरील जमिनीवर असलेल्या विहिरीवरची मोटार बिघडली असून ती दुरुस्त करायची आहे असे सांगून तीन दिवसांपुर्वी पांडुरंग संतोषला घेऊन गेला. त्यानंतर दोघे एकत्र दारू प्यायले.

मुलीवर लैंगिक अत्याचार, नगरसेविकेची पतीविरोधात तक्रार

पांडुरंग याच्या डोक्यात असलेल्या रागातून दगडाने ठेचून संतोषने त्याचा खून केला. दरम्यान पती घरी परत न आल्याने संतोषच्या पत्नीने पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांना संशय आल्याने तपास सुरू केला. त्यावेळी संतोषचा खून झाल्याचे समोर आले. पोलिसांनी पांडुरंगला अटक केली . त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी चार वाजता मृतदेह ताब्यात घेतला, त्यावेळी खून झाल्याचे स्पष्ट झाले.

[amazon_link asins=’B01F7AX9ZA,B0778JFC13′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9151ab3d-bd97-11e8-a157-379a96afc916′]