ऑनलाइन फसवणूक झाल्यास ‘सायबर क्राइम’कडे ‘या’ पध्दतीनं करा तक्रार, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या ऑनलाइनचा जमाना आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक वस्तू ऑनलाईन मागवले जातात. कोरोना काळात ऑनलाईन खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ऑनलाईन खरेदी करत असताना सायबर गुन्हेगार आपला खासगी डेटा चोरून त्या द्वारे फसवणूक करतात. ऑनलाइन किंवा डिजीटल पेमेंट करताना अनेकांची फसवणूक केली जाते. फसवणूक झाल्यानंतर नेमकं काय करायचे हे अनेकांना माहित नसते. त्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावते. या गुन्ह्याला सायबर क्राइममध्ये ठेवले जाते. त्यामुळे अशा प्रकरणात तक्रार कशी आणि कोणाकडे करायची हे जाणून घ्या.

ऑनलाइन तक्रार नोंदवा
सायबर क्राइमची तक्रार करण्यासाठी हे पोर्टल देशातील गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. यामध्ये ऑनलाइन तक्रार करता येते. याठिकाणी तक्रार केल्यानंतर पोलीस ठाण्यात हेलपाटे मारावे लागत नाहीत. याची सर्व माहिती ऑनलाइन मिळते. तसेच आपली ओळख गुप्त ठेवली जाते. जर तुमच्या बाबतीत सायबर क्राईम झाले असेल तर तुम्ही सर्वात आधी राष्ट्रीय सायबर गुन्ह्याकडे रिपोर्ट करा. सायबर क्राईमच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रार करा. ही वेबसाईट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध आहे. तक्रार करण्यासाठी cybercrime.gov.in ही अधिकृत वेबसाइट आहे.

वेबसाईटवर सर्व माहिती भरा
सायबर क्राईम वेबसाईटवर पोर्टलशी संबंधित सर्व माहिती भरा. या वेबसाइटमध्ये सायबर क्राइम रिलेटेड टू महिला-लहान मुले आणि रिपोर्टमध्ये सायबर क्राइमचे दोन भाग केलेले असतात. तक्रारदार यांना कशामध्ये तक्रार करायची आहे त्यावर क्लिक करावे लागते. सायबर क्राइम अंतर्गत धोका, फिशिंग, हॅकिंग आणि फ्रॉड यासरखे मुद्दे येतात. यावर क्लिक केल्यानंतर फोन नंबर, संपूर्ण नाव इत्यादी माहिती विचारली जाते.

युनिक नंबरवरुन तक्रीराचा फॉलोअप
सायबर क्राइम संबंधित महिला-लहान मुलांपासून ऑनलाइन बुकिंग, पोर्नोग्राफी आणि सेक्सुअली एक्सप्लिस्ट येतात. यामध्ये जो विषय असेल त्यात तुम्ही तक्रार करु शकता. तुमचे नाव गुप्त ठेवले जाते. तुम्हाला कोणत्याही कॅटेगरीत तक्रार करता येते. तक्रार करताना आरोपीचे नाव, ठिकाण आणि पुरावा मागितला जातो. सर्व माहिती भरल्यानंतर तक्रार सबमिट करा. तक्रार सबमिट केल्यानंतर तुम्हाला तक्रार आयडी दिला जातो. तो एक युनिक नंबर असतो. जर तुम्हाला या तक्रारीचा फॉलोअप घेयचा असेल तर या नंबरवरुन घेता येऊ शकतो.

असे जाणून घ्या तक्रारीचे स्टेटस
तक्रार नोंदवल्यानंतर त्याचा स्टेट्स जाणून घेण्यासाठी त्याला ट्रॅक करावे लागते. अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगइन करा. लॉगिन झाल्यानंतर रिपोर्ट अँड ट्रॅकवर क्लिक करा. यानंतर तुम्हाला एक युनिक नंबर मिळतो. यावर सर्व माहिती मिळते.