संतापजनक ! पुण्यात सावत्र बापाकडून १४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुपारी गरम होत असल्याने आई बाहेर बसल्याचा डाव साधून सावत्र पित्याने १४ वर्षीय मुलीवर भरदिवसा लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार वडगाव बु. येथे समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात सावत्र पित्याविरोधात पॉस्को सह बलात्काराचा गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

पिडीत मुलीच्या आईने यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पिडीत मुलीच्या आईने दुसरा विवाह केला आहे. दरम्य़ान पिडीत मुलगी ही पहिल्या पतीपासून झालेले अपत्य आहे. शनिवारी दुपारी खुप गर्मी होत असल्याने फिर्यादी या घराबाहेर बसल्या होत्या. त्या बाहेर बसलेल्या असताना त्यांची मुलगी घरात झोपलेली होती. त्यावेळी याचाच गैरफायदा घेत त्यांच्या दुसऱ्या पतीने झोपलेल्या मुलीच्या अंगावर पडून त्याने अत्याचार केले. पुढील तपास सहायक पलीस निरीक्षक साळुंखे करत आहेत.