पुण्यात टप्प्याटप्प्याने Unlock करा ! अजित पवारांच्या बैठकीत भूमिका मांडणार, महापौर मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने 1 जूनपर्यंत लॉकडाऊन केले आहे. 1 जूननंतर अनलॉकची प्रक्रिया सुरु होणार आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात एकदम अनलॉक करण्याऐवजी टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्याची भूमिका घेतली आहे. येत्या शुक्रवारी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत आपली भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे प्लॅटफॉर्म फॉर कोव्हिड रिस्पॉन्स आणि महापालिकेतील अधिकारी तसेच पदाधिकारी यांच्यामध्ये आज (मंगळवार) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची तयारी करणे तसेच लसीकरण या विषयावर या बैठकीत चर्चा झाली. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनुभव लक्षात घेता सरकट अनलॉक करु नये अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून कशा पद्धतीने आपण लॉकडाऊन त्यातून पुन्हा अनलॉक आणि पुन्हा लॉकडाऊन मध्ये कसे गेलो हे अनुभवले आहे. यातून हे लक्षात आले की ताताडीने पूर्ण अनलॉक करुन उपयोग नाही. टप्प्याटप्प्याने हा अनलॉक केला गेला पाहिजे. सुरुवातील फक्त जे शनिवार रविवार अत्यावश्यक दुकांनं संपूर्ण बंद असतात ती सुरु करावीत. त्यानंतर हळूहळू सूट द्यावी अशी आमची भूमिका आहे. येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत मी ही भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, लसीकरणासंदर्भात सिरम इन्स्टिट्यूट महापालिकेला लस देण्यास तयार आहे. मात्र, त्यांनी यासाठी केंद्राकडून परवानगी मागायची भूमिका घेतली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारशी चर्चा झाली असून येत्या दोन दिवसांमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट होऊ शकते, अशी माहिती महापौरांनी दिली. ते एका वृत्तपत्राशी बोलत होते.