सावत्र आईनं चिमुकल्याला तापलेल्या तव्यावर केलं उभा, मुलगा गंभीर जखमी, FIR दाखल

मोताळा: पोलीसनामा ऑनलाईन – अवघ्या आठ वर्षाच्या चिमुकल्याला सावत्र आईने तापलेल्या तव्यावर उभा केल्याने चिमुकला गंभीर जखमी झाला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात ही धक्कादायक घटना समोर आली आहे. जखमी चिमुकल्यावर सध्या बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी पीडित मुलाच्या मामाने बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने सावत्र आई विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शारदा सचिन शिंगोटे असे गुन्हा दाखल केलेल्या सावत्र आईचे नाव आहे. वैभव मनोहर मानकर (19 रा. जयपूर लांडे, खामगाव) या पीडित चिमुकल्याचे मामांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात शनिवारी (दि. 26) तक्रार दिली आहे.

तक्रारीत नमुद केले आहे की, घरात खेळताना पीडित आठ वर्षाच्या मुलाचा लोखंडी कपाटाला धक्का लागल्याने ते कपाट त्याच्या छोट्या बहिणीच्या अंगावर पडता राहिले होते. पीडित मुलाच्या सावत्र आईने ते रोखले होते. 15 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. त्यावेळी पीडित मुलास त्याची सावत्र आई शारदा शिंगोटे हीने गरम तव्यावर उभे केेले होते. त्यामुळे आठ वर्षाच्या मुलाचे तळपाय भाजून जखमा झाल्या होत्या. ही बाब पीडित मुलाने वैभवला सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान चिमुकला जखमी झाल्यानंतर त्याच्यावर प्रथम खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार करून त्याला अकोला येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित मुलाची आई शारदा सचीन शिंगोटे यांच्या विरोधात विविध कलमांसह बालन्याय मुलाची काळजी व संरक्षण अधिनियम 2005 अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अनिल भुसारी हे करीत आहे.

बाल कल्याण समितीने नोंदवला बयाण
बुलडाणा येथील बाल कल्याण समितीनेही शुक्रवारी या मुलाचा बयाण नोंदवल्याची माहिती बाल कल्याण समितीच्या सदस्य ॲड. किरण राठोड यांनी दिली. समितीने मुलाच्या पुनर्वसनाच्या दृष्टीने त्याचा बयाण नोंदविला आहे तर पोलिसांनीही प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या दृष्टीने शुक्रवारीच बयाण नोंदवले होते. दरम्यान याप्रकरणात आता मुलाचा मामा पुढे आला आहे. मुलाची आजी व त्याच्या मामाने मुलाच्या संगोपनाची जबाबदारी स्वीकारल्यास अल्पवयीन मुलाला त्यांच्या ताब्यात समिती देवू शकते असेही ॲड. किरण राठोड यांनी सांगितले.

दरम्यान सध्या या मुलावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येत असून या पीडित मुलास त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात येवू नये असे पत्रच बालकल्याण समितीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांना यदिले आहे. त्यामुळे सध्या हा मुलगा बाल कल्याण समितीच्या ताब्यात आहे.