धक्कादायक ! 38 वर्षीय सावत्र आईनं 16 वर्षाच्या मुलाशी ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध, पतीनं केला ‘पर्दाफाश’

पोलीसनामा ऑनलाईन टीम – आई या नात्याला काळिमा फासण्याचं काम ब्रिटनमधील एका सावत्र आईने केलं आहे. ही सावत्र आई आपल्या १६ वर्षीय मुलासोबत तब्बल २ वर्षे जबरदस्तीने संबंध ठेवत होती. नंतर हे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने या महिलेला ५ वर्षाची शिक्षा सुनावली आहे. यावेळी महिलेने कोर्टात सांगितलं की, सर्व काही मुलाच्या मनाप्रमाणेच झालंय.

ही ३८ वर्षीय महिला गेल्या २ वर्षांपासून आपल्या मुलासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवायची, त्याने नकार दिला तर त्याला तसे संबंध ठेवायला भाग पाडायची. पण या गोष्टींचा महिलेच्या पतीला संशय येत होता, तेव्हा त्याने तिच्या रूममध्ये एक साउंड रेकॉर्डर लपवून ठेवला यात महिलेचं बोलणं रेकॉर्ड झालं आणि तिचा भांडाफोड झाला.

रूममध्ये ठेवलेलं रेकॉर्डिंग जेव्हा तिच्या पतीने ऐकलं तेव्हा त्याने याबाबत महिलेला जाब विचारला. त्यावर महिलेने तो १६ वर्षाचा असून आम्ही केवळ गंमत करत होतो असे सांगितले. नंतर महिलेच्या पतीने तिच्याविरोधात लैंगिग शोषणाची तक्रार दाखल केली. मुलाचे वकिल लॉरा पिटमॅन यांनी आपली बाजू मांडताना कोर्टात सांगितले की भलेही मुलाचं वय शारीरिक संबंधासाठी १६ असलं तरीही हा गुन्हाच आहे.

मुलाने कोर्टात बोलताना सांगितले की, तो १५ वर्षाचा होता तेव्हापासून त्याची सावत्र आई त्याच्यासोबत फ्लर्ट करायची. त्याच्या १६ व्या वाढदिवसादिवशी त्यांच्यात पहिल्यांदा शारीरिक संबंध झाले व ती सावत्र आई रोज शारीरिक संबंधासाठी जबरदस्ती करू लागली. नंतर त्या महिलेने ती गर्भवती असल्याचं सांगत त्याला ब्लॅकमेलही करायची. दरम्यान पोलीस चौकशीत आढळलं की, ही महिला गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असून तिला मल्टिपल डिसऑर्डर नावाचा आजार होता.