स्टीव्ह जॉब्स यांनी बनवलेल्या अॅपल – संगणकाचा होणार लिलाव

सॅन फ्रान्सिस्को  :  वृत्तसंस्था 
तंत्रज्ञान क्षेत्रात जगातील आघाडीवर असलेल्या ‘अॅपल’ कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझनिक यांनी  तयार केलेला अॅपल-१  संगणकाचा लिलाव होणार आहे . अॅपल कंपनीसाठी महत्वाचा असलेला हा अॅपल-१ हा  संगणक अजूनही  कार्यरत असून  २५  सप्टेंबर रोजी त्याचा लिलाव होणार आहे.   ‘अॅपल’ आपले सर्वात जुनं पण ऐतिहासिक प्रॉडक्ट विकण्यासाठी लिलाव  करत आहे. लिलावामध्ये या संगणकाला सुमारे ३ लाख डॉलर एवढी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B0784D7NFX’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’947d7d1b-aab3-11e8-9dff-671271a9f82b’]

१९७०  साली अॅपल कंपनीचे संस्थापक स्टीव्ह जॉब्स आणि स्टीव्ह वोझनिक यांनी अॅपल १ हा संगणक तयार केला होता. . या खास संगणकाचा लिलाव बोस्टन स्थित आरआर ऑक्शनकडून आजोजित करण्यात येणार आहे. अॅपल १ हा संगणक त्या खास ६०  संगणकांपैकी आहे, जे आजही अस्तित्वात आहेत. हा एक डेस्कटॉप संगणक आहे.  अॅपलने १९७६ साली तो बाजारात आणला होता. विशेष म्हणजे तब्बल ४२ वर्षांनीदेखील हा संगणक व्यवस्थित सुरु आहे.

लिलावामध्ये मदरबोर्ड, मेन्युअल, पीरियड स्टाइल मॉनिटर आणि कीबोर्ड यांचाही समावेश असणार आहे.१९७६  साली संगणक किती शक्तिशाली होता, हे या माध्यमातून दाखवण्यात येईल. अॅपल’च्या या पहिल्या  संगणकासाठी काही कोट्यावधींची  बोली लागण्याची चर्चा आहे.

‘शुभ लग्न सावधान’ १२ ऑक्टोबरला