ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉला सर्वात ‘स्वार्थी क्रिकेटर’

लंडन : वृत्तसंस्था 
ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज शेन वॉर्न यांचे आगामी पुस्तक ‘नो स्पिन’ मधुन वॉर्नने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. या पुस्तकात स्टीव्ह वॉला सर्वात ‘स्वार्थी क्रिकेटर’ आहे असे म्हंटले आहे. तसेच या पुस्तकात ड्रेसिंग रुममधील काही मोठ्या घटनांचा खुलासाही करण्यात आला आहे.
याचबरोबर ‘बॅगी कॅप’ (ऑस्ट्रेलिया संघाची टोपी) विषयी अंधभक्ती करण्याचीही आपल्याला चीड होती, असेही त्याने म्हटले आहे. या पुस्तकातील काही भाग माध्यमांद्वारे प्रसिद्ध केला आहे, ज्यामध्ये हे खुलासे स्पष्ट करण्यात आले आहेत. तसेच, ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमची जेवढी पुजा केली जाते, ज्यामध्ये जस्टिन लँगर, मॅथ्यू हेडन आणि अॅडम गिलख्रिस्ट यांचाविषयी देखील खुप श्रद्धा होती. पण आपल्या विषयी नसल्यांची खंत वॉर्नने व्यक्त केली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’90b5a4a8-c61b-11e8-ba35-13c6a209ac8d’]
विशेष म्हणजे “मला संघ खुप आवडायचा, पण प्रामाणिकपणे सांगायचे तर अर्ध्यापेक्षा जास्त वेळ ते मला कमी दाखवायचे. मला ते म्हणायचे की, विम्बल्डनमध्ये संघाची कॅप कुणी घालेल का ? हे शरमेने मान खाली घालायला लावणारे आहे. मार्क वॉलाही माझ्या बद्दल असेच वाटायचे. मला हे सिद्ध करण्यासाठी ‘बॅगी ग्रीन’ कॅपची गरज नव्हती, की माझ्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून खेळण किती महत्त्वाचे आहे किंवा आम्हाला पाहणाऱ्या लोकांसाठी हे किती महत्त्वाचे आहे ? कुठेही गेल्यानंतर संघाची कॅप घालणे फार महत्त्वाचे नाही, पण काही खेळाडू सतत ही कॅप घालून फिरायचे ? इतकेच नव्हे तर  स्टीव्ह वॉबाबतही वॉर्नने या पुस्तकात लिहिले आहे. फॉर्मात नसल्याचा हवाला देत वॉर्नला १९९९ साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून वगळण्यात आले होते, तेव्हा आपल्या कर्णधाराचे समर्थन न मिळाल्यामुळे आपल्याला कमी दाखवले  होते असेही या पुस्तकातून वॉर्नने म्हंटले आहे.

[amazon_link asins=’B073T3DG4Y,B06ZZB71TB’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9bc6be1f-c61b-11e8-a6da-071e99969076′]
 ”मी उपकर्णधार होतो आणि एक गोलंदाज म्हणून संघात होतो. टुगा (वॉ) ने निवडीच्या बैठकीला सुरुवात केली आणि प्रशिक्षक ज्योफ मार्श म्हणाले, ‘वार्नी, मला नाही वाटत की तू पुढच्या कसोटीत खेळावे” वॉर्न पुढे म्हणतो, “शांतता पसरली, मग मी विचारले का? मग उत्तर मिळाले, ‘मला नाही वाटत, की तू चांगली गोलंदाजी करतोयस.’ मग मी म्हणालो, ‘हा, योग्य निर्णय आहे.’ पुन्हा मी सांगितलं, ‘माझा खांदा सर्जरीनंतर जास्त वेळ घेत आहे, एवढा वेळ घेईल असे वाटले  नव्हते , पण मी लवकरच पुनरागमन करेन, फॉर्म हळूहळू परत येत आहे आणि लवकरच लय मिळेल. मला याची चिंता नाही” असा किस्सा वॉर्नने पुस्तकात लिहिला आहे. “निराशा हा जास्त कठोर शब्द नाही. पण जेव्हा कठीण परिस्थिती आली तेव्हा टुगाने माझे समर्थन केले नाही आणि त्याने मला कमी दाखवले, ज्याचे मी एवढे समर्थन केले  होते आणि तो माझा चांगला मित्रही होता”, असे म्हणत वॉवर वॉर्नने ताशेरे ओढले आहेत.

[amazon_link asins=’B00FRCNR6U,B01G5I8YLC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’cc10b1e1-c61c-11e8-a19e-8711f96c32e3′]
कर्णधार झाल्यानंतर वॉची भूमिका एकदमच बदलली होती, असे सांगण्याचा प्रयत्न वॉर्नने यातून केला आहे. वॉर्न पुढे लिहितो, “माझ्या कामगिरी व्यतिरिक्त इतरही घटना घडल्या होत्या. मला वाटते की ही चढाओढ होती. त्याने मला माझ्या प्रत्येक गोष्टीवर टोकणे  सुरु केले. मला माझी डाएट पाहायला सांगितली आणि असे म्हणाला की, ‘तू या गोष्टीवर लक्ष दे, की तू जीवनात चांगला व्यक्ती कसा बनशील’. मग मी त्याला म्हणालो, मित्रा, तू तुझ्या बाबतीत विचार कर”, असेही याद नमूद केली आहे.
वॉर्नच्या या पुस्तकातील काही भागानेच क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. मात्र एकेकाळी क्रिकेटवर कायम वर्चस्व गाजवणाऱ्या संघातील अशा गोष्टी समोर आल्याने जगभरात विविध चर्चा होत आहेत. विरोधी संघाची स्लेजिंग करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ऑस्ट्रेलिया संघातही नेहमी ‘ऑल इज वेल’ नव्हते, हे यानिमित्ताने समोर आले आहे.
जाहिरात