‘पॉर्न’ सिनेमात धमाकेदार ‘एन्ट्री’ करण्याची घोषणा करणार्‍या स्टीवन स्पिलबर्गच्या मुलीला अटक

नवी दिल्ली : वृतसंस्ता – जेव्हापासून हॉलीवुड चित्रपट निर्माते स्टीवन स्पीलबर्ग यांची मुलगी मिकायला जॉर्ज हिने अ‍ॅडल्ट एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये आपले करियर करण्याची घोषणा केली आहे, तेव्हापासून या निर्मात्याची चिंता खुपच वाढली आहे. परंतु, आता मिकायला समोरील अडचणी खुपच वाढल्या आहेत. घरगुती हिंसेच्या आरोपाखाली तिला पोलिसांनी अटक केली आहे.

मिकायलाचा नियोजित वर चक पेनको याने फॉक्स न्यूजशी बोलताना या घटनेला दुजोरा देताना सांगितले की, ही घटना खरी आहे. गैरसमजामुळे हे झाले आहे. चकने घडलेल्या घटनेबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. परंतु, त्याने हे सांगितले की, या घटनेत कोणाचे काहीही नुकसान झालेले नाही. मिकायला हिला शनिवार 29 फेब्रुवारीला सकाळी 6:30 वाजता अटक करण्यात आली. यानंतर तिला डिटेन्शन सेंटरमध्ये नेण्यात आले. जेथे 1000 डॉलरचा दंड भरल्यानंतर तिची सुटका झाली. मिकायलाचा नियोजित वर चक पेनको हा मिकायलाच्या पॉर्न स्टार बनण्याच्या निर्णयाचे समर्थन करत आहे.

काही कालावधीपूर्वी मिकायला जॉर्जने घोषणा केली होती की, ती पॉर्न स्टार म्हणून आपले करियर करणार आहे. तिन हेदेखील म्हटले होते की, तिने स्वत:चे अ‍ॅडल्ट व्हिडिओ तयार करण्यास सुरूवातही केली आहे. परंतु, तिचे वडील या गोष्टीमुळे खुपच चिंतेत आहेत.

यापूर्वी मिकायलाने द सन सोबत बोलातना म्हटले होते की, मी नेहमीच सेक्शुअली अ‍ॅक्टिव्ह व्यक्ती राहिले आहे. ज्यामुळे अगोदरपासूनच अडचणींमध्ये अडकली आहे. मी कुणाचेही नुकसान केलेले नाही. परंतु, मला वाटते की, काही लोक या क्षेत्रातील माझ्या उपस्थितीमुळे अस्वस्थ आहेत.