सणांसाठी देवी-देवतांचे आसन कसे असावे ? जाणून घ्या स्थापनेचा योग्य नियम

नवी दिल्ली : आसन शरीरातील उर्जेला पृथ्वीमध्ये जाण्यापासून रोखते आणि एक विशेष प्रकारच्या उर्जा मंडलाची निर्मिती करते. तसेच देवी-देवतांना विशेष प्रकारच्या आसनावर बसून पूजा केल्याने विशेष प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात. देवी-देवतांचे आसन आपल्या आसनांपेक्षा उंच असावे. आसन रेशमी किंवा धातुचे असावे. आपले आसन ऊनी किंवा सूती असावे. अगोदर देवांना आसन देतात. नंतर स्वत: आसनावर बसावे.

माता लक्ष्मीचे आसन आणि त्याचे महत्व
याची स्थापना सोमवार, बुधवार किंवा शुक्रवारी केली जाते. मातेची प्रतिमा नेहमी गुलाबी आसनावर किंवा कमळाच्या आसनावर स्थापन करावी. गुलाबी आसनावर लक्ष्मी मातेला स्थापन केल्यास धन, समृद्धी आणि संपन्नता प्राप्त होते. कमळाच्या आसनावर स्थापना केल्यास नोकरीतील बाधा दूर होतात आणि मनासारखी नोकरी मिळते. स्थापना केल्यानंतर ॐ श्रीं महालक्ष्मये नमः या मंत्राचा जप करावा.

भगवान शंकराचे आसन आणि त्याचे महत्व
भगवान शंकराची मूती आणि शिवलिंगाच्या स्थापनेत फरक आहे. मूर्तीची स्थापना शुक्रवारी आणि शिवलिंगाची स्थापना सोमवारी केली जाते. शिवलिंगाची स्थापना नेहमी धातुच्या आसनावर केली पाहिजे. यामुळे कौटुंबिक सुख मिळते. शिवमूर्तीची स्थापना मोठ्या ऊनी किंवा सफेद रेशमी वस्त्राच्या आसनावर केली पाहिजे. यामुळे आरोग्याची प्राप्ती होते. स्थापना केल्यानंतर नमः शिवाय मंत्राचा जप करावा.

दुर्गामाता किंवा देवीचे आसन आणि त्याचे महत्व
याची स्थापना बुधवारी केली जाते. दुर्गामातेला नेहमी लाल आसन समर्पित केले पाहिजे. आसनासह मातेला नेहमी लाल चुनरी अर्पण करावी. लाल आसन अर्पण केल्याने शक्ती, धाडस आणि आरोग्याची प्राप्ती होते. स्थापनेनंतर ॐ दुं दुर्गाये नमः मंत्राचा जप करावा.