प्रेयसीच्या मुलीसह तिच्या नातीला जाळणारा संशयित पोलिसांच्या तावडीतून फरार

नाशिकः पोलीसनामा आॅनलाईन

अनैतिक संबंधाच्या वादातून प्रेयसीच्या मुलीला आणि नातीला झोपेतच असताना अंगावर राॅकेल टाकून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना शहरातील पंचवटी भागात घडली होती. या घटनेत तिघींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. सदर घटनेतील संशयित आरोपीला मथुरेहून नाशिकला घेऊन येत असताना रेल्वे हळू झाल्याचा आणि अंधाराचा फायदा घेत आरोपीने रेल्वेतून उडी मारून पलायन केले. त्याला पकडण्यासाठी गेलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी देखील रेल्वेतून उडी मारल्याने ते जखमी झाले आहेत. दरम्यान तिघींना जाळणारा संशयित इसम फरार झाला आहे.

शहरातील पंचवटी परिसरात राहणाऱ्या कालिका नगरमध्ये राहणाऱ्या संगीता सुरेस देवरे (वय-38) या महिलेचे चलालोद्दीन खान (वय-55 रा. कानोरीया गाव, जिल्हा मथुरा ) नावाच्या व्यक्तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी (5 आॅगस्ट) रोजी संध्याकाळी दोघांमध्ये वाद झाला. यानंतर पहाटे चार च्या दरम्यान संगीता, तिची मुलगी प्रीती आणि नात सिद्धी हे झोपेत असताना त्यांच्या बेडवर आणि अंगावर रॉकेल टाकून पेटवून देत जलालोद्दीन खान हा फरार झाला होता.
[amazon_link asins=’B07D1QK2FJ’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7de11244-9bdd-11e8-b285-19c167babfb5′]
या घटनेत नऊ महिन्याच्या सिद्धीचा आगीत होरपळून मृत्यू झाला होता. तर संगीत आणि प्रिती या 70 टक्क्यापेक्षा अधिक भाजल्याने त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान दोघींचाही मृत्यू झाला. या घटनेत दीपक गिरमे हे जखमी झाले असून वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी नाशिकहून पुन्हा एक पथक त्यांच्या मदतीला आणि आरोपीला शोधण्यासाठी पाठविले आहे.