पिडीत मुलीच्या डोळया-अंगावर टाकेच टाके, नराधम रिक्षाचालकाचं कृत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीतील जनाकपुरी परिसरात रविवारी दारूच्या नशेत असणाऱ्या एका रिक्षा चालकाने एका ६ वर्षाच्या मुलीसोबत दुष्कर्म केले. यावेळी अत्याचार करून तो मुलीचा जीव घेण्याच्या प्रयत्नात असताना नागरिकांनी त्याला पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी या प्रकरणात आरोपीला अटक केली आहे. अरुण कुमार दास असे या रिक्षा चालक आरोपीचे नाव आहे. अत्याचार करण्यात आलेल्या या मुलीची प्रकृती नाजूक असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. रविवारी रात्री या रिक्षा चालकाने आपल्या आई वडिलांसोबत फुटपाथवर झोपलेल्या या मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केले.

डॉक्टरांनी या अत्याचाराविषयी माहिती देताना सांगितले कि, तिच्या शरीरावर मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात जखमा आणि नखांचे निशाण आहेत. तिच्या शरीरावरील प्रत्येक अंगावर जखमा असून त्यावर मोठ्या प्रमाणात टाके घालण्यात आले आहेत. त्याचबरोबर तिला डोळे देखील उघडण्यास अडचण येत आहे. त्याचबरोबर तिला आवाज देखील काढण्यास त्रास होत आहे. आरोपीने तिला जमिनीवर आपटत मारण्याचा देखील प्रयत्न केला. मंगळवारी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाति मालीवाल यांनी या मुलीच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलला भेट दिली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले कि, मुलीला पूर्णपणे बरे होण्यासाठी एक वर्षाचा कालावधी जाणार आहे.

नागरिकांचे प्रदर्शन
या घटनेवर नाराजी दर्शवत निषेध करण्यासाठी काल नागरिकांनी जनकपुरी भागात आंदोलन केले. या कृत्यासाठी नागरिकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. त्यामुळे आता या प्रकरणात पोलिसांना कडक कारवाई करण्याची गरज असून आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याचे आव्हान त्यांच्यापुढे आहे.

आरोग्यविषयक वृत्त

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

स्ट्रेच मार्क घालवण्यासाठी ‘हे’ ५ घरगुती उपाय, जाणून घ्या

Loading...
You might also like