शेअर ब्रोकरने ३३ जणांना घातला साडेतीन कोटींचा गंडा

कोल्हापूर : पोलीसनामा आॅनलाइन – शेअर ब्रोकरने तब्बल ३३ जणांना चूना लावल्याची घटना कोल्हापूरात घडली आहे. येथील एका शेअर ब्रोकरने गुंतवणुकदारांनी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे स्वत:च्या फायद्यासाठी वापरले. याप्रकरणी फसवणूक झालेल्या ३३ जणांनी ब्रोकरविरूद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दखल केली आहे. ३ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ब्रोकर अल्ताफ हाजी शेख (३२) याला अटक केली आहे. अजिज हाजी शेख (३५, रा. उजळाईवाडी) आणि सुनील गोंधळी यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’311c59d3-d13a-11e8-b6ca-3326bf1ed194′]

याप्रकरणी रणजित मारुती पोवाळकर (३५, रा. दोनवडे, ता. करवीर) यांनी फिर्याद दिली आहे. अल्ताफ हाजी शेख याने कोल्हापूरसह आसपासच्या गुंतवणूकदारांना मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले होते. या आमिषानुसार २१ सप्टेंबर २०१३ पासून त्याच्याकडे दोनवडे येथील रणजित मारुती पोवाळकर यांनी गुंतवणुकीस सुरुवात केली. सुरूवातीला सर्व गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत होता. त्यामुळे गुंतवणूकदारांची संख्या वाढत गेली. शेख याने भाऊ अजिज शेख आणि मित्र सुनील गोंधळी यांच्या मदतीने गुंतवणूकदारांना आकर्षित केले होते.

राज्यात दुष्काळ अन्… मोदींच्या कार्यक्रमाला कोटींची उधळपट्टी : धनंजय मुंडे

[amazon_link asins=’B0745BNFYV’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’6cee3958-d13a-11e8-ba08-cf12d1147dee’]

त्याने विविध ठिकाणी म्हणजेच मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील हॉटेल सह्याद्री, शाहूपुरी, राजारामपुरी येथील शेख याच्या कार्यालयात गुंतवणुकीची रक्कम स्वीकारली होती. २२ जुलै २०१७ पर्यंत ३३ गुंतवणूकदारांनी त्याच्याकडे ३ कोटी ६६ लाख रुपयांची गुंतवणूक केली. शेख याच्याकडे विचारपूस केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आठ ते दहा गुंतवणूकदारांनी त्याची भेट घेऊन पैशांची मागणी केली; मात्र शेअर मार्केटमधील अकाऊंट हॅक झाल्याने काही महिन्यांनंतर पैसे मिळतील, असे सांगून तो सर्वांना टाळू लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रणजित पोवाळकर यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली.

[amazon_link asins=’B07B4TZKFN’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’772df8d4-d13a-11e8-bafc-b17461d58bef’]

पोवाळकर यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अल्ताफ शेख याला अटक केली. त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याचा भाऊ अजिज आणि साथीदार सुनील गोंधळी यांचा शोध सुरू आहे. तसेच पोलिसांनी शेख याच्या कार्यालयातून लॅपटॉप व त्याचा मोबाईल जप्त केला आहे.

जाहिरात