Sensex Crosses 50,000 : Kei Biden धमाका ! शेयर बाजाराने रचला इतिहास, Sensex 50,000 च्या पुढे, Nifty ने सुद्धा गाठला 14,700 चा स्तर

STOCK MARKET : भारतीय शेयर बाजाराने ऐतिहासिक ऊंची गाठली आहे. सेंसेक्सने 50,000 चा स्तर पार केला आहे. देशाच्या स्टॉक एक्सचेंजच्या इतिहासात पहिल्यांदा हे स्थान गाठले आहे आणि गुंतवणुकदारांसाठी ही शानदार संधी आहे.

सकाळी 9 वाजून 24 मिनिटाला बाजाराची स्थिती
सकाळी 9 वाजून 24 मिनिटांनी सेंसेक्स 266.96 अंकाच्या उसळीसह म्हणजे 0.54 टक्के वर 50,059.08 ची लेव्हल दिसत आहे आणि यासोबतच एनएसईचा 50 शेयरचा इंडेक्स निफ्टी 79.10 अंक म्हणजे 0.54 टक्केच्या जबरदस्त तेजीसह 14,723.80 च्या स्तरावर व्यवहार करत आहे.

बँकिंग शेयर्सने शानदार उसळी घेतल्याने मिळाला सपोर्ट
बँकिंग शेयर्सने शानदार उसळी घेतल्याने शेयर बाजाराला मोठा सपोर्ट मिळाला आहे आणि याद्वारे बँक निफ्टीमध्ये सुद्धा 32,700 चा स्तर पार केला आहे. व्यवहार सुरू होण्याच्या सुरुवातीच्या 15 मिनिटातच बँक निफ्टी 158.95 अंक म्हणजे 0.49 टक्केच्या मोठ्या तेजीसह 32,702.65 वर व्यवहार करत होता.

का येत आहे शेयर बाजारात जबरदस्त तेजी
अमेरिकेचे नवे राष्ट्रपती जो बायडन राष्ट्राध्यक्षपदी स्थानापन्न झाल्याने अमेरिकन बाजारात जबरदस्त तेजी दिसून आली, यातून स्पष्ट होते की, अन्य ग्लोबल मार्केटला सुद्धा याचा फायदा मिळेल आणि असेच झाले. आज प्री-ओपनमध्ये शेयर बाजारात सेन्सेक्सने 50 हजारचा स्तर गाठला आणि 9.15 वाजता बाजार खुला होताच सेंसेक्सने ही ऐतिहासिक लेव्हल पार केली आणि गुंतवणुकदारांनी जल्लोष केला.