Stock Market | गुंतवणूकदारांना दिलासा ! आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारात किंचित तेजी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Stock Market | आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर बाजारामध्ये (Stock Market) तेजीत उघडल्याचं दिसून येत आहे. कालच्या पडझडीनंतर आज (मंगळवारी) मात्र शेअर बाजार तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. प्री-ओपनिंगमध्येही (Pre-Opening) बाजार तेजीत होता. आज पहिल्याच सत्रात सेन्सेक्समध्ये (Sensex) 215 अंकानी वधारल्याचं पाहायला मिळालं. तर, काल शेअर बाजारात कमालीची घसरण झाली होती. सेन्सेक्स तब्बल 1200 अंकांच्या घसरणीसह बंद झाला होता. (Share Market Marathi News)

दरम्यान, गुंतवणूकदारांना (Investors) एक दिलासा देणारीच ही बातमी आहे. कारण, शेअर बाजार खुला होताच पहिल्याच सत्रामध्ये सेंसेक्स आणि निफ्टी मध्ये अनुक्रमे 215 आणि 85 अंकाची वाढ पहायला मिळाली आहे. आज (मंगळवार) शेअर बाजारात किंचित तेजी दिसत असल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला. मागील 5 एप्रिलपासून शेअर बाजारात मंदीचे वातावरण आहे. याचा अधिक फटका हा एचडीएफसी (HDFC), एचडीएफसी बँक (HDFC Bank) आणि इन्फोसिस (Infosys) सारख्या कंपन्यांना बसला आहे. (Stock Market)

सध्या शेअर बाजारात विक्रेते आणि खरेदीदार यांच्यात एक विचित्र स्पर्धा होताना दिसत आहे. त्याचा मोठा फटका हा शेअर मार्केटला बसताना दिसून येतोय. शेअर मार्केटवर विक्रीचा दबाव वाढल्याने मंदीचे वातावरण आहे. सध्या स्थितीत बजाज फायनान्स सर्व्हिसेस (Bajaj Finance Services), मारुती (Maruti), एसबीआय (SBI) आणि अल्ट्राटेक सीमेंट (Ultratech Cement) यांच्या शेअरमध्ये तेजी आहे, तर दुसरीकडे एचडीएफसी, एचडीएफसी बँक, इन्फोसिस सारख्या कंपन्यांच्या शेअर्सचे दर घटले आहेत.

 

‘हे’ शेअर तेजीत –

  • आयशर मोटर्स
  • JSW स्टील
  • कोल इंडिया
  • हिरो मोटोकॉर्प
  • BPCL –

‘या’ कंपन्यांचे शेअर्स मध्ये घट –

  • Infosys
  • एच डी एफ सी
  • HDFC Bank
  • HDFC Life
  • Dr Reddy’s Laboratories Ltd
Advt.

(डिस्क्लेमर : – याठिकाणी केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती (Share Performance Information) दिली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नसून शेअर मार्केट मधील (Stock Market) गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. येथे दिलेला मजकूर केवळ माहितीच्या हेतूने दिलेला आहे. www.policenama.com कडून कुणालाही पैसे लावण्याचा कधीही सल्ला दिला जात नाही.)

Web Title : Stock Market | Consolation to investors! The stock market rose slightly on the second day of the week

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा